नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले असून या नुकसान

नंदुरबार प्रतिनिधी – नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार नंदुरबार जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली, जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार ३६०० पेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पिकानुसार पंचनामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना सरसकट भरपाई न देता पिकांच्या झालेल्या नुकसानीनुसार भरपाई देण्यात येईल. विधिमंडळाच्या अधिवेशनातच भरपाई संदर्भातली घोषणा करण्यात येईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात दिली.
COMMENTS