पाथर्डी ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेवगाव रस्त्यावरील गेट क्रमांक दोन समोरील अतिक्रमण काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच
पाथर्डी ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेवगाव रस्त्यावरील गेट क्रमांक दोन समोरील अतिक्रमण काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले; दरम्यान दोन महिन्यात अतिक्रमण काढण्यात येईल या बाजार समितीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे आले.
शेवगाव रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पश्चिमेकडील गेट बंद असून या संदर्भात अनेकदा अनेकांनी आंदोलन केली मात्र बाजार समितीकडून आंदोलनकर्त्यांना आश्वासन देण्यात आले.आज बुधवारी आठवडे बाजाराच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अरविंद सोनटक्के,गोरक्ष ढाकणे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे यांनी कोरडगाव रस्त्या समोरील मुख्य प्रवेशद्वारासमोर गेट बंद केले.त्यानंतर ढाकणे यांनी बाजार समितीच्या मुख्य दालनात ठिय्या आंदोलन सुरू करत समितीचे सभापती,उपसभापती व काही संचालक मंडळ यांच्याशी ढाकणे यांनी चर्चा केली. बाजार समिती प्रशासन न्यायालयीन प्रक्रियेचा मुद्दा असल्याने तूर्तास अतिक्रमण काढता येणार नाही अशा भूमिकेवर ठाम राहिल्याने ढाकणे आणि आक्रमक पवित्र घेत सभागृह दणाणून सोडले.यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे अकोल्याचे सरपंच अर्जुन धायतडक, मल्हारी घुले, महादेव दहिफळे,यांच्यासह अनेक युवक पदाधिकारी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना सभापती सुभाष बर्डे यांनी म्हटले की, आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षांपासून अतिशय प्रामाणिकपणे कारभार चालू असून याचाच भाग म्हणून आज एक वर्षात सव्वा कोटीच्या ठेवी आणि पावणे दोन कोटीचा बिझनेस झाला आहे. या सगळ्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत अतिक्रमण झालं असं विरोधक म्हणत आहे,प रंतु तसं पाहिलं तर बाजार समितीमध्ये कमीतकमी 25 ठिकाणी अतिक्रमण आहेत. 2020 साली बाजार समितीमध्ये सत्तेत असणार्यानी पहिलं अधिकृत गेट काढण्याचे लेखी दिले,अतिक्रमण ठेवायला हेच खरे कारणीभूत असून त्या जागेच्या मालक यांच्याशी आम्ही चर्चा केली असून लोकअदालत मध्ये त्यांनी दोन महिन्याची मुदत मागितली असून त्याची विनंती न्यायालयाने मान्य केल्याने सर्व संचालक मंडळाने दोन महिन्यांनी त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.विरोधकांना 23 तारखेला सुलेनामा झाला असून ही जागा मोकळी होणार असल्याचा सुगावा लागल्याने याचे श्रेय लाटण्यासाठी आजच आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले.
मी स्वतः ते अतिक्रमण काढून टाकीन ः अॅड. ढाकणे – यावेळी ढाकणे यावेळी बोलताना म्हटले की, बाजार समितीचा शेवगाव रस्त्यावरील गेट क्रमांक दोन अनेक वर्षांपासून काही राजकीय मंडळींनी अधिकृत करून त्या ठिकाणी पक्के बांधकाम केले आहे त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड अडचण होत आहे. कोणते राजकीय पुढारी संबंधित अतिक्रमणधारकांना खुलेआम राजकीय संरक्षण देत आहेत हे न समजणे इतकी जनता नक्कीच खुळी नाही. आज एकच गेट असल्यामुळे वाहतूक कोंडी होते याला जबाबदार कुणाला धरायचे.बाजार समिती प्रशासनाने येत्या दोन महिन्यात संबंधित अतिक्रमण काढून घेऊ असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर ढाकणे यांनी पुन्हा संस्थेने दिलेली मुदत आम्ही मान्य करतो मात्र त्यानंतर अतिक्रमण निघाले नाही तर मी स्वतः ते अतिक्रमण काढून टाकीन असा गंभीर इशारा अॅउ. प्रताप ढाकणे यांनी शेवटी दिला.
COMMENTS