Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात मनसैनिक इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक

पुणे : मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर इंग्रजी पाट्यांविरोधात राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मि

वंदे भारत ट्रेनमध्ये ओढली विडी
मुंबईत पाणी संकट अधिक गडद
जिल्हा परिषदेतील 32 आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती

पुणे : मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर इंग्रजी पाट्यांविरोधात राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान आज मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली जंगली महाराज रोडवरील हॉटेल, दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. तर यावेळी दुकानांवर दगडफेक करीत बोर्ड फोडण्यात आले.
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दुकान, हॉटेलवर असणार्‍या इंग्रजी पाट्यांविरोधात मनसैनिक आंदोलन करीत आहे. आमच्या भूमिकेची दखल न्यायालयाने देखील घेतली. राज्यातील दुकान, हॉटेल यावरील मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर आज आम्ही आंदोलन केले आहे. ही आंदोलनांची सुरुवात आहे. पण भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. पोलिसांनी मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना ताब्यात घेतले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील दुकानांची तोडफोड करणार्‍या आक्रमक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांवर असणार्‍या इंग्रजी पाट्यांवर दगडफेक केली.

COMMENTS