Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अग्रवाल दाम्पत्यांच्या पोलिस कोठडीत 5 दिवसांची वाढ

पुणे ः पुणे पोर्शे कार अपघातातील आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना आज पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. शि

कैलास गिरवले मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा : शेख यांची मागणी
ओबीसी आरक्षण राबवणे नगर जिल्हाधिकार्‍यांना भोवणार ? ; डॉ. भोसलेंना सर्वोच्च न्यायालयाने दिली नोटीस
 मोकाट कुत्र्यांविरोधात एमआयएमचे मनपा समोर मिठाई वाटत आंदोलन 

पुणे ः पुणे पोर्शे कार अपघातातील आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना आज पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना कोर्टाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.
पुणे अपघात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावणी. आजच्या सुनावणीदरम्यान चौकशी अधिकार्‍यांनी सांगितले की, ’साक्षीदार, एफ एस एल यांच्या तपासातून निष्पन्न झालं की विधी संघर्षात बालकाच्या ऐवजी आईचे रक्त वापरण्यात आले. या सगळ्या षडयंत्रामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींचे म्हणजे विशाल अग्रवाल आण शिवानी अग्रवाल यांच्या डीएनए सँपल घ्यायचे आहेत. 3 लाख रुपये कोणाकडून घेतले आहेत याचा तपास करायचा आहे. मूळ रक्त नमुने आणि त्यातील सिरींज कोणाला दिली याचा शोध घ्यायचा आहे. 

COMMENTS