तीन वर्षांनी 5 लाखांचे दागिने मिळाले…डोळ्यांत आनंदाश्रू दाटले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन वर्षांनी 5 लाखांचे दागिने मिळाले…डोळ्यांत आनंदाश्रू दाटले…

अहमदनगर/प्रतिनिधी : तीन वर्षांपूर्वी चोरीस गेलेले पाच लाखाचे दागिने मूळ मालकास न्यायालयीन प्रक्रियेनंतर पोलिसांनी परत केल्यावर त्या मालकाच्या डोळ्यात

 ’बाप्पाला पत्र ’ स्पर्धेत श्रीज्या मोहन रासकर सर्वप्रथम
संजीवनीच्या सहा अभियंत्यांची नोकरीसाठी निवड
मनपा व जिल्हा परिषद कर्मचारी निवडणुकीत रंगणार

अहमदनगर/प्रतिनिधी : तीन वर्षांपूर्वी चोरीस गेलेले पाच लाखाचे दागिने मूळ मालकास न्यायालयीन प्रक्रियेनंतर पोलिसांनी परत केल्यावर त्या मालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. त्याने पोलिसांना हात जोडत कृतज्ञता व्यक्त केली. याबाबतची माहिती अशी की, कोपरगाव शहरातील गांधीनगर येथे तीन वर्षापूर्वी भाडोत्री म्हणून राहणार्‍या मुंबई येथील एका जोडप्याने साडेपाच लाख रुपये किमतीचे 12 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. हे दागिने पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने मूळ मालकास नुकतेच परत केले आहे.
महेश नारायण कडलग (वय 24, रा. गांधीनगर, कोपरगाव) यांनी त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने बनविले होते. कडलग यांच्या मालकीच्या घरात नवनीत नाईक व त्याची पत्नी स्मिता नाईक हे एक महिन्यासाठी भाडोत्री राहावयास होते. त्यांनी कडलग यांच्या आईचा विश्‍वास संपादन करून त्यांच्या घरातून त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी बनविलेले दागिने व रोख रक्कम असा किमती मुद्देमाल चोरुन पळून गेले होते. या प्रकरणी महेश कडलग यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात 22 सप्टेंबर 2018 गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक केली होती. तसेच त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांकडे सोपविला होता. हस्तगत केलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कडलग यांच्या स्वाधीन केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, सहायक पोलिस निरीक्षक भरत नागरे, पोलिस नाईक सचिन शेवाळे, गणेश थोरात, मनोज काटे, रामकृष्ण खारतोडे, महिला पोलिस प्रिती बनकर यांच्या पथकाने तपासाची कारवाई केली. तीन वर्षांपूर्वी चोरीस गेलेल्या 12 तोळे दागिन्यांची आशा कडलग परिवाराने जवळपास सोडलीच होती. पण पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया करून त्यांचे दागिने त्यांना परत केल्याने कडलग परिवाराने आनंद व्यक्त केला.

COMMENTS