Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संप संपल्यानंतर आज पासून होणार नुकसानीचे पंचनामे; ४० ते ४५  हेक्टर वरील पिकांचे नुकसान

गोंदिया प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात कर्मचारी संप मागे घेतल्यानंतर अखेर आज पासून जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे सुरु

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाडिक गटाची एंट्री; कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष
ऐन सणासुदीत भाजीपाल्यांचे दर भडकले
महाबळेश्‍वर येथील पर्यटन महोत्सव समन्वयातून यशस्वी करावा : पालकमंत्री

गोंदिया प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यात कर्मचारी संप मागे घेतल्यानंतर अखेर आज पासून जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे सुरु झाले असून कृषि सहाय्याकांची लगभग आता शेतकऱ्यांच्या बांध्यावर पहायला मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुक्यांचा समावेश आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात शनिवार पासुन वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला आहे. या पावसाचा फटका भाजीपाला पिकांना बसला आहे. झालेल्या नुकसानी ने शेतकरी हवालदिल झालं असल्याने आता गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तर दूसरी कड़े गोंदिया जिल्ह्यात ४० ते ४५  हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून तब्बल ३० गावे बाधित झाले आहे. मात्र कर्मचारी संपामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नव्हते मात्र, संप मागे घेतल्याने अखेर आज पासुन नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात होणार आहे.

COMMENTS