Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापूर घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक संपन्न 

नाशिक- बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अतिशय निंदनीय असून त्या घटनेबाबत नाशिक जिल्ह्यातील शाळेतील सुरक्षेचा आढावा पालकमं

युवकांनी लोकशाही बळकट व समृद्ध करावी : तहसीलदार नानासाहेब आगळे
महर्षी शाळेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत

नाशिक– बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अतिशय निंदनीय असून त्या घटनेबाबत नाशिक जिल्ह्यातील शाळेतील सुरक्षेचा आढावा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षेखाली घेतला असून आजच्या बैठकीत उपस्थितांनी या घटनेचा निषेध केला. यावेळी जिल्हाभरातील शिक्षण संस्थेचे संस्थाचालक प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

पालकमंत्री महोदय यांनी कालच्या दुर्दैवी घटनेनंतर शहरातील संस्थाचालक तसेच प्रतिनिधी समवेत बैठक आयोजित करून जिल्हाभरात काय उपाययोजना केल्या पाहिजेत यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी उपस्थितांनी काही सूचना केल्या असून या सूचनांची दखल घेवून तत्काळ अंमलबजावणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

या घटनेतील आरोपीला अटक केली असून संस्था चालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री महोदय यांनी दिली आहे.

दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच घटनेवेळी सरकारने एसआयटी स्थापन करून आरोपीला अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक खटला चालवला होता, त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात कोर्टाने निकाल देऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली आहे.

COMMENTS