Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात दोघांची हत्या करून वाशिम गाठलं अन् जंगलात लपला

चाकण पोलिसांनी सिनेस्टाईल पकडलं

पुणे प्रतिनिधी - चाकण येथून दुहेरी हत्याकांडाने परिसरातील नागरिका हादरले होते. अखेर आता या हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी शिताफीने अटक

मासेमारी नौकांसाठी मार्च महिन्यात १ लाख ६८ हजार कि.लि.डिझेल कोटा मंजू
आता पाचवी-आठवीत उत्तीर्ण होणे बंधनकारक
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे : विभागीय आयुक्त देशमुख

पुणे प्रतिनिधी – चाकण येथून दुहेरी हत्याकांडाने परिसरातील नागरिका हादरले होते. अखेर आता या हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. हा आरोपी चाकणमध्ये दोघांची हत्या करून वाशिममधील जंगलात फरार झाला होता. मात्र, अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला वाशिममधून अटक केली. प्रदीप दिलीप भगत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. बिल्डिंगमध्ये येवू न दिल्याच्या रागातून आरोपीने दोन जणांचा खून केला असल्याची बाब समोर आली. दोघांची हत्या केल्यानंतर हा आरोपी फरार झाला. यानंतर तो वाशिम येथे जंगलामध्ये वास्तव करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे चाकण पोलिसांनी त्याला जंगलात जाऊन शिताफीने ताब्यात घेतलं आहे.

COMMENTS