Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्या भांडणाची कुरापत काढून डोक्यात बियरची बॉटल मारून केले गंभीर जखमी

माजलगाव प्रतिनिधी - तालुक्यातील पात्रुड येथील प्रदीप हरिभाऊ तरटे वय 28 वर्ष हे हॉटेल व शेतीचा व्यवसाय करत असून. त्यांचे पात्रुड ते माजलगाव जाणार

 माझ्या यशात समता परिवाराचे महत्त्वपूर्ण योगदान ः अक्षय आव्हाड
शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य
आमदारांच्या अपात्रतेवर 8 दिवसांत निर्णय घ्या

माजलगाव प्रतिनिधी – तालुक्यातील पात्रुड येथील प्रदीप हरिभाऊ तरटे वय 28 वर्ष हे हॉटेल व शेतीचा व्यवसाय करत असून. त्यांचे पात्रुड ते माजलगाव जाणारे हायवे पात्रुड कॅम्पवर विघ्नहर्ता रसवंती व हॉटेल आहे. दि.11/10/2023 रोजी 7:15 वा. गावातीलच गणेश रामेश्‍वर चाळक हा त्याच्या मोटरसायकलवर हॉटेलवर आला व पूर्वी माझ्यासोबत भांडण का केले अशी कुरापत काढून प्रदीप तरटे यांचे भाऊ रोहित व मेव्हणे दीपक हारकळ यांना शिवीगाळ करत त्यांना उसाने व विटाने मारहाण करत चाकू घेऊन त्यांच्या मागे लागला. याची तक्रार माजलगाव पोलीस स्टेशनला देण्यासाठी जात असताना सिंदफणा पुलाजवळ गणेश रामेश्‍वर चाळक याने प्रदीप हरिभाऊ तरटे याच्या डोक्यात बियरची बॉटल मारून गंभीर जखमी केले.
पात्रुड ते माजलगाव जाणारे हायवे लगत पात्रुड कॅम्पवर विघ्नहर्ता रसवंती व हॉटेल असून हे हॉटेल चालवून प्रदीप हरिभाऊ तरटे वय 28 वर्ष हे आपली व कुटुंबाची उपजीविका भागतात.दि. 11/10/2023 रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास भाऊ रोहित व मेव्हणा दीपक शिवराम हारकळ यांनी फोन करून सांगितले की, आम्ही विघ्नहर्ता हॉटेलवर काम करत असताना आपल्या गावातील गणेश रामेश्‍वर चाळक रा. पात्रुड हा मोटरसायकलवर येऊन हॉटेल समोर गाडी उभा करून तुम्ही यापूर्वी माझ्यासोबत भांडण का केले असे म्हणून आम्हाला शिव्या देऊ लागला व त्याचे हातात चाकू घेऊन मला व मेहुणे दीपक शिवराम हारकळ यांना धमकावू लागला व आम्हाला उसाने, विटा ने मारहाण केली व तो आमचे मागे चाकू घेऊन पळू लागला तेव्हा आम्ही हॉटेल सोडून रोडने पळत समोर आलो आहोत तू लवकर हॉटेल वर ये असे सांगितले. त्यानंतर मी व सचिन राजाभाऊ जाधव, आकाश अंकुश जंगले, संतोष वैजनाथ जंगले असे आम्ही मोटारसायकलवर आलो. तेव्हा माझा भाऊ रोहित व मेहुणे दीपक यांनी झालेला प्रकार सांगितल्याने आम्ही घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी माजलगाव येथे जात असताना रात्री 08:00 वा. च्या सुमारास सिंदफणा पुला जवळ देशमुख नगर कॉलनी समोर रोडवर गणेश रामेश्‍वर चाळक हा त्याची शाईन कंपनीचे मोटारसायकलवर येऊन तो मला म्हणाला की मला तुझ्याशी बोलायचे आहे दोन मिनिट थांब असे म्हणाल्यानंतर मी रोडच्या बाजूला मोटार सायकल थांबवताच गणेश याने कमरेला लावलेली बियरची बॉटल काढून माझे कानपट्टीवर मारून गंभीर दुखापत केली. त्यामुळे माझे डोके फुटून रक्तबंबाळ झाल्याने मला भाऊ रोहित, सचिन जाधव, आकाश जंगले, संतोष जंगले व दीपक हरकळ यांनी ग्रामीण रुग्णालय माजलगाव येथे घेऊन औषधोपचार केले. अशी फिर्याद प्रदीप हरिभाऊ तरटे रा. पात्रुड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव येथे दिल्यावरून आरोपी गणेश रामेश्‍वर चाळक यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 326,323,504,506 नुसार गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास माजलगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह जोनवाल हे करत आहेत.

COMMENTS