नोकियाने कंपनीची नवीन ओळख करून देताना आपला आयकॉनिक लोगो बदलला आहे. 60 वर्षात पहिल्यांदा कंपनीने हे पाऊल उचलले आहे. जगभरातील युजर्स बऱ्याच काळापास
नोकियाने कंपनीची नवीन ओळख करून देताना आपला आयकॉनिक लोगो बदलला आहे. 60 वर्षात पहिल्यांदा कंपनीने हे पाऊल उचलले आहे. जगभरातील युजर्स बऱ्याच काळापासून याची वाट पाहत होते. फार पूर्वीपासून कंपनी आपल्या मजबूत मोबाईल फोनसाठी ओळखली जाते. इतर नवीन कंपन्यांच्या तुलनेत सध्या नोकियाच्या मोबाईल फोनची विक्री कमी झाली आहे. मात्र आता आपला लोगो बदलून कंपनीने बदलाचे संकेत दिले आहेत.
Nokia New Logo: असा आहे नवीन लोगो नवीन नोकिया लोगोमध्ये पाच वेगवेगळ्या आकारांचा समावेश आहे. ज्यातून “NOKIA” हा शब्द तयार होतो. पूर्वी फक्त निळ्या रंगाचे ठळक आणि सामान्य शब्द कंपनीच्या लोगोत होते. पण आता यूजर्स लोगोमध्ये रंगीबेरंगी कलर (Nokia New Logo) कॉम्बिनेशन पाहू शकतात. जे सूचित करते की कंपनीचे नवीन लक्ष आता व्यवसाय तंत्रज्ञान बाजारावर असेल.
नोकियाचे सीईओने केली मोठी घोषणा – एका मुलाखतीदरम्यान कंपनीचे सीईओ Pekka Lundmark यांनी सांगितले की, कंपनीचे प्राधान्य आता फक्त स्मार्टफोन राहिलेले नाही. ते म्हणाले, “आता आम्ही एक व्यावसायिक तंत्रज्ञान कंपनी बनली आहे. नोकियाने आता विविध व्यवसाय पर्यायांमध्ये गुंतवणुकीसह विस्तार करण्याची योजना आखली आहे.”
COMMENTS