काबूल ः अफगाणिस्तान चार दिवसांनंतर पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. बुधवारी पहाटे अफगाणिस्तानच्या वायव्य भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाण

काबूल ः अफगाणिस्तान चार दिवसांनंतर पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. बुधवारी पहाटे अफगाणिस्तानच्या वायव्य भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. हेरात प्रांताच्या राजधानीपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर हा भूकंप आला. चार दिवसांपूर्वी म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मोठी वित्तहानी देखील याठिकाणी झाली होती. अफगाणिस्तानातील हा भूकंप दोन दशकांतील सर्वात भीषण भूकंप असल्याचे तालिबानचे म्हणणे आहे.
COMMENTS