Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अद्वैतानंद शास्त्रीजी महाराज यांचे निधन

अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील भिलवडी गावातील दुर्गादेवी संस्थांनचे मठाधिपती 1008 अद्वैतानंद शास्त्रीजी महाराज यांचे शनिवारी सायंकाळी हृदयविकाराच्

विजेच्या पोलवर दिव्यांऐवजी पेटल्या मशाली
कातळापूरमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप
दारणा पाणलोटातील पावसाने गोदावरी खोर्‍यात समाधान

अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील भिलवडी गावातील दुर्गादेवी संस्थांनचे मठाधिपती 1008 अद्वैतानंद शास्त्रीजी महाराज यांचे शनिवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील सर्व गावावरती शोककळा पसरली आहे.
महाराजांनी डोंगरदर्‍यातील लोकांमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा कार्य केले. त्याचबरोबर ते आयुर्वेद शास्त्रातील मान्यताप्राप्त उपचार तज्ज्ञ देखील होते. त्यांनी वेदशास्त्रातील वेदांताचार्य ही उपाधी प्राप्त केली होती. त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता पसरली आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तगण शोक सागरात बुडाले. सायंकाळी सात वाजल्यापासून भिलवडे गावातील दुर्गाशक्ती गडावरती अनेक भाविक येत आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी पाथर्डी येथे तातडीने हलविण्यात आले परंतु प्रवासादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. 1990 साली त्यांनी  डोंगराच्या कुशीमध्ये वसलेल्या भिलवडे गावातील पुरातन हेमाडपंथी शैलीतील देवी मंदिराचा जिर्णोद्धार केला आणि दुर्गादेवीची प्राणप्रतिष्ठा करून धार्मिक कार्यास सुरुवात केली. त्यांनी वेदशास्त्रातील कीर्तने ही अहमदनगर जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केलेली आहेत.

COMMENTS