अ‍ॅड. उज्ज्वल निकम लढवणार श्रद्धा वालकर हत्येचा खटला ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. उज्ज्वल निकम लढवणार श्रद्धा वालकर हत्येचा खटला ?

मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्रातील वसई परिसरात राहणार्‍या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची

कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना पद भरतीत प्राधान्य : ना. शंभूराज देसाई
कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये ?
लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्रातील वसई परिसरात राहणार्‍या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांना दिली.
मुंबई दौर्‍यावर असलेले बिर्ला यांची डॉ. गोर्‍हे यांनी भेटी घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या भेटीदरम्यान उभयंतांमध्ये महिला अत्याचाराबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी डॉ. गोर्‍हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावर त्यांनी त्वरित संमती देत याबाबत कार्यवाही करीत असल्याचे सांगितले होते. यावेळी डॉ. गोर्‍हे यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना एक लेखी निवेदन सादर केले. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध घडामोडींची माहिती डॉ. गोर्‍हे यांनी बिर्ला यांना यावेळी दिली.

COMMENTS