Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. शिंदे आणि डॉ. मंचरकर यांचा वैचारिक वारसा जपला पाहिजे

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

श्रीरामपूर ः भारतीय स्वातंत्र्य संग्राम,शैक्षणिक, सामाजिक सेवेचे आदर्श असणारे स्व. अ‍ॅड. रावसाहेब शिंदे आणि शिक्षण, साहित्य क्षेत्रातील ज्ञानतपस्

शास्त्रीजींनी १९६५ च्या भारत पाक युध्दात भारताला विजय मिळवून दिला – आ. डॉ. सुधीर तांबे
भुजबळांच्या सडकून टीकेवर बोलण्यास सुधीर तांबे यांचा नाकार
कमी पटसंख्यांच्या शाळाबंदीमुळे गरीब मुले वंचित राहण्याची भीती

श्रीरामपूर ः भारतीय स्वातंत्र्य संग्राम,शैक्षणिक, सामाजिक सेवेचे आदर्श असणारे स्व. अ‍ॅड. रावसाहेब शिंदे आणि शिक्षण, साहित्य क्षेत्रातील ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्त्व असणारे स्व. डॉ. र.बा. मंचरकर यांच्या समर्पित जीवन कार्याचा वैचारिक वारसा जपला पाहिजे असे मत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.
येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे महादेव मळ्यात अड, रावसाहेब शिंदे यांच्या96 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार डॉ. सुधीर तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. राजीव रावसाहेब शिंदे होते. प्रारंभी अड, रावसाहेब शिंदे यांच्या समाधीला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अङ, रावसाहेब शिंदे व डॉ.र.बा. मंचरकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचे सत्कार केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय ओळख करून दिला. यावेळी डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांना स्व.अड. रावसाहेब शिंदे  स्मृती जीवन गौरव पुरस्कार तर कोपरगाव येथील प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे यांना स्व. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती प्रेरणा पुरकार प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, बुके, पुस्तके, गौरवचिन्ह देऊन दोघांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य टी.ई. शेळके, डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. प्रेरणा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधीर तांबे यांनी अड, रावसाहेब शिंदे, डॉ. अण्णासाहेब शिंदे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, कॉम्रेड अड, पी.बी. कडू पाटील यांचे भारतीय स्वातत्र्य लढ्यातील योगदान सांगून कौटुंबिक आठवणीना उजाळा दिला. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात एक चारित्र्यसंपन्न, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून डॉ. मंचरकर यांचे वेगळेपण स्पष्ट करून रावसाहेब शिंदे व डॉ. मंचरकर यांचे परस्परसंबंध सांगितले. योग्य व्यक्तींना पुरस्कार दिल्याबद्दल विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. राजीव शिंदे यांनी पुरस्कार्थीचे अभिनंदन करून डॉ. सुधीर तांबे यांच्यासारख्या वैद्यकिय, सामाजिक, शैक्षणिक कार्यात योगदान देणार्‍या प्रामाणिक, अनुभवी व्यक्तीच्या उपास्थितीत कार्यक्रम झाल्याचे यावेळी समाधान व्यक्त केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उपस्थितांना आपली नवी पुस्तके ’ग्रंथसंवाद,  माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ ही पुस्तके सस्नेह भेट दिली. माजी तहसिलदार गुलाबराव पादीर यांनी सत्कार्थींचा शाल, बुके देऊन सत्कार केला. सोहळ्यास शशिकलाताई शिंदे, सुजाताताई हुंबे, डॉ. प्रथमा मंचरकर, प्रकाश पाटील निकम, अड भागचंद चुडिवाल, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य विनोद रोहमारे, बापूसाहेब पटारे, डॉ. रवींद्र कुटे, ह.भ.प प्रा. सखाराम कार्डिले महाराज, नीतीन औताडे, प्राचार्या रंजना जरे, प्राचार्या चित्रा सूरडकर, डॉ. श्रीकांत भालेराव, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, रामरावदादा पडघन, सुभाष लिंगायत, दत्तात्रय रायपल्ली, सुभाषराव गायकवाड, बाबासाहेब चेडे, भीमराज बागूल, जयाताई फरगडे, मुख्याध्यापक भागवतराव मुठे, भागचंद औताडे, प्रा.सौ.जयश्री शेंडगे,प्रा.अंकिता शेंडगे, अपूर्व शेंडगे, अनुजा शेंडगे, अशोक खेमनर आदी उपस्थित होते. बाळासाहेब बुरकुले,संकेत    बुरकुले, सुयोग बुरकुले, कय्युम शेख, सतिश गवळी, सतिश थोरात, पुंडलिक खैरनार, रावसाहेब राशिनकर,अमित त्रिभुवन, भाऊसाहेब जाधव आदीसह शिक्षक, शिक्षिका यांनी  नियोजन केले. सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी करून आभार मानले.

COMMENTS