Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांना दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार

जामखेड ः ग्रामीण विकास केंद्र जामखेड या संस्थेनचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांना पुणे येथील दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार नुकताच जाह

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये सामाजिक उपक्रम
आत्मा मालिक मध्ये साईच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावे

जामखेड ः ग्रामीण विकास केंद्र जामखेड या संस्थेनचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांना पुणे येथील दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. अनाथ, निराधार, वंचित, दलित, आदिवासी, लोककलावंत, भटके-विमुक्त तसेच निवारा बालगृहाच्या माध्यमातून 85 मुलांचे शिक्षण व संगोपन करणारे अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांना पुणे येथील दादा कोंडके मेमो फाउंडेशन श्रद्धेय दादा कोंडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार-2024 चा 26 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रोड, पुणे येथे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस व प्रमुख पाहुणे राजेंद्र पवार (मुख्य अभियंता महावितरण पुणे परिमंडळ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती दादा कोंडके मेमो फाउंडेशनचे प्रमुख मनोहर कोलते यांनी दिली.
   अ‍ॅड. डॉ.अरुण जाधव यांच्या कार्याची ख्याती राज्यभर आहे.उपेक्षित वर्गांसाठी स्वतःला 31 वर्षापासून वाहुन घेतले आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये मॅगसेसे पुरस्कर्ते डॉ रजनीकांत आरोळे यांच्यानंतर ड डॉ अरुण जाधव यांचा नंबर लागतो .खरं तर आरोळे मानसपूत्र समजत होते.सतत गोरगरीब व कष्टकरी यांच्यासाठी निस्वार्थी पणे काम करणार्‍या कार्यकर्त्याचा सन्मान निश्‍चित होतो.याच महिन्यांमध्ये दोन पुरस्कार आबांना जाहीर झाले आहेत.पुणे येथील मानाचा पुरस्कार कै.तात्यासाहेब देशमुख व मराठी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध सिने अभिनेते व दिग्दर्शक दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हे सर्व यश अ‍ॅड डॉ अरुण जाधव यांच्या सोबत काम करणार्‍या सर्व सहकार्‍यांना जाते.या पुरस्कारामुळे जामखेड तालुक्यांचं नाव राज्यभर गाजत आहे.महाराष्ट्रातील संस्था, संघटना, साहित्यीक , विचारवंत, पत्रकार, राजकीय नेते, सामाजिक चळवळीतले प्रमुख फोन, मेसेज द्वारे अभिनंदनाचा वर्षाव करित आहेत.

COMMENTS