Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. आंबेडकर अकोल्यातून लढणार लोकसभा निवडणूक

अकोला/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने जवळपास सर्वंच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यासाठी उमेदवारांची चाचपणी देखी

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून योगदान द्यावे-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
सोलापूर आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर जागतिक हेरिटेज दिन साजरा
शिवरायांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका

अकोला/प्रतिनिधी ः आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने जवळपास सर्वंच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यासाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे. तर दुसरीकडे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेईल अशी चर्चा सुरू असतांना आघाडीकडून कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक अकोला मतदारसंघातून लढतील अशी घोषणा करण्यात आली. यामुळे अकोल्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत अ‍ॅड. आंबेडकरांच्या अनेक बैठका झाल्या असून, त्यांनी वंचितला सोबत घेण्याचा शब्द दिला असला तरी, त्याबाबत पुढे कोणतीही चर्चा न झाल्यामुळे कुणावरही विसंबून राहण्यापेक्षा वंचितने आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. परंपरागत अकोला लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड. आंबेडकर स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. 1984 ते सातत्याने या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. आता 2024 मध्ये सलग अकराव्यांदा ते येथून आपले नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघात वंचितचे मोठे प्राबल्य आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि शेकडो ग्रामपंचायती वंचितच्या ताब्यात आहेत. त्यामुळे वंचितचे पारडे या मतदारसंघात जड आहे. या मतदारसंघावर 1984 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसने आपले वर्चस्व राखले. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुका लढूनदेखील काँग्रेसचा सातत्याने पराभवच झाला. 1998 आणि 1999 च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला आहे. 2004 पासून सलग चार लोकसभा निवडणुका खासदार संजय धोत्रे यांनी जिंकून अकोला मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड निर्माण केला. भाजप, काँग्रेस व वंचित आघाडीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत, भाजपला थेट लाभ झाल्याचा अकोल्याचा इतिहास आहे. आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्याशिवाय भाजपचा पराभव होऊ शकत नसल्याचे लोकसभेच्या गेल्या नऊ निवडणुकांच्या निकालावरून समोर येते.

COMMENTS