Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 कोपरगाव मतदारसंघातील रस्त्यांसह विविध विकास कामांना सहा कोटीची प्रशासकीय मान्यता ः आमदार आशुतोष काळे 

कोपरगाव : आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील  ग्रामीण भागातील विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभ

नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आ. काळेंच्या तहसीलदारांना सूचना
आमदार आशुतोष काळेंनी भाविकांना केले फराळ वाटप
डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हीच खरी आदरांजली – आमदार आशुतोष काळे

कोपरगाव : आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील  ग्रामीण भागातील विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने शासन निर्णय करून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या एकूण सहा कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून मतदार संघातील रस्त्यांसह विविध विकास कामांचा यामध्ये समावेश आहे.
आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांना 3000 कोटीचा निधी आणला आहे. त्यामुळे मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून शिल्लक विकासकामांचा निपटारा करण्यासाठी उर्वरित सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत विकासकामांना 2515-1238 लेखाशीर्ष या योजने अंतर्गत प्रशासकीय मंजुरी दिली असून यामध्ये मतदार संघातील डाऊच खुर्द येथे बाळू प्रभाकर गुरसळ घर ते महमंद शेख घर रस्ता करणे (25 लक्ष), मौजे सोनेवाडी येथे दत्त मंदिर ते किशोर जावळे घर रस्ता करणे (25 लक्ष), मौजे दहेगांव बोलका गांव ते गोधेगांव चौफुली रस्ता करणे (30 लक्ष),  सडे येथील संतोष बारहाते वस्ती ते देठे वस्ती रस्ता करणे (20 लक्ष), मौजे मुर्शतपूर येथे माणिक शिंदे घर ते दत्तात्रय चौधरी घर रस्ता करणे. (म्हसोबा नगर) (20 लक्ष), हिंगणी येथे पांडुरंग पुंजा मोरे घर ते काळे वस्ती रस्ता करणे (20 लक्ष), वेळापूर येथे रामा 7 जिल्हा परिषद शाळा ते मंडलिक वस्ती रस्ता करणे (20 लक्ष), मायगांव देवी येथे प्रजिमा 4 ते मायगांव देवी गाव रस्ता करणे (25 लक्ष), उक्कडगांव येथे शत्रूगुण बाबुराव कराळे घर ते देविदास चव्हाण घर रस्ता करणे(50 लक्ष),चितळी येथील बौद्धविहार बांधकाम करणे (20 लक्ष), पुणतांबा येथे डॉ. गोरक्ष गगे घर ते गुरुदत्त स्वॉमील पर्यत रस्ता करणे. (20 लक्ष), टाकळी गांव ते आण्णासाहेब मारुती देवकर घर रस्ता (देवी रोड) करणे (20 लक्ष), भोजडे येथे स्मशान भूमी संरक्षक भिंत बांधणे (10लक्ष), मंजूर येथे रामा 7 विरेन बोरावके शेती (शेतवाट) ते शिवाजी धोदमल घर रस्ता करणे (20 लक्ष), करंजी येथे पढेगांव ओगदी रोड ते जि.प. शाळा चरमळ वस्ती रस्ता करणे(10 लक्ष), कान्हेगांव येथे कान्हेगांव चौकी ते शरद सांगळे वस्ती रस्ता करणे(10 लक्ष), खोपडी येथे राजेंद्र दुशिंग घर ते जालिंदर वारकर घर रस्ता करणे (10 लक्ष), येसगांव येथे हेमंतकाका बोरावके घर ते गणेश गायकवाड घर रस्ता करणे (20 लक्ष), धनगरवाडी येथे योगेश रकटे घर ते रमेश भोंडे घर रस्ता करणे (10लक्ष),नपावाडी येथे गोरख पुंजाजी धनवटे घर ते गोरख काशिनाथ धनवटे घर रस्ता करणे (10लक्ष), रामपूरवाडी येथे भाऊराव शिंदे घर ते रमेश गोरे घर रस्ता करणे (10लक्ष), वाकडी येथे मच्छिंद्र एलम घर ते संजय एलम घर रस्ता करणे (10लक्ष) आदी रस्त्यांसाठी एकूण सहा कोटीच्या रस्त्यांना निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

COMMENTS