exclusive stamp. exclusive round grunge sign. label अशोक सोनवणे अहमदनगर- नगर जिल्ह्यात शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी(माध्यमिक )कक्ष अधिक्षक यांनी
अशोक सोनवणे अहमदनगर- नगर जिल्ह्यात शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी(माध्यमिक )कक्ष अधिक्षक यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरभरती केलेली आहे.याबाबत दै.लोकमंथनने पाठपुरावा करुन हा झालेला गैरप्रकार उजेडात आणला. त्याची शिक्षण उपसंचालक औदुंबर उकीरडे यांनी दखल घेऊन यापुर्वीच्या त्रिसदस्य समितीची नेमणूक जावक क्रमांक शिउसं/पुवि आस्था १०४/तक्रार अर्ज चौकशी ५२००/२०२३पत्रान्वये करुन हि समिती शुक्रवार दि.१९रोजी अहमदनगर माध्यमिक विभागात चौकशीसाठी येईल अशी अपेक्षा तक्रारदारांना होती.समितीपुढे नस्ति सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता मात्र चौकशी समितीच्या अध्यक्षांचा मुजोरीपणा आणि निर्ढावलेली वृत्तीमुळे संजय नाईकडे यांनीच शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.आदेशाचे पालन झाले नाही त्यामुळे आता शिक्षण उपसंचालक औदुबंर उकीरडे यांनी समितीचे अध्यक्ष सदस्य यांचेवरच प्रशासकीय कारवाई करणार असल्याची माहिती दै.लोकमंथनला दिली.
शुक्रवारी चौकशी समितीस नस्ति उपलब्ध करुन देण्यास पुर्वीप्रमाणेच चालढकल करुन शिक्षणाधिकारी आणि कक्ष अधिकारी यांनी सहकार्य केले नाही तर महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल )१९७९ मधील तरतुदीनुसार प्रशासकीय शिस्तभंग कारवाई करण्याचा आदेश देण्यात आलेला होता. मात्र सध्या हा आदेश केवळ पोकळ गर्जना ठरला आहे.
संपुर्ण राज्यात सन२०१२पासुन शिक्षक भरतीप्रक्रियेला स्थगिती असताना बनावट दस्तऐवज बनवुन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी आणि उपसंचालक यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार करुन पदभरती केली.याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करुनही
शिक्षण विभागातील निर्ढावलेले अधिकारी जाणुनबुजुन चालढकल करत असुन आरोपांच्या फैरी झडत असलेले कक्ष अधिकारी बऱ्याच वर्षापासून कुणाच्या तरी मेहरबानीने ठाण मांडून आहे.अक्षरशः चौकशी समितीला एक पानाची जागा संदर्भ देण्यासाठी म्हणजे तब्बल सत्ताविस संदर्भ द्यावे लागतात.यावरुनच शिक्षण विभागातील तक्रारींच्या चौकशीतील पारदर्शकता चांगलीच अधोरेखीत होते.शासनाने दप्तर दिरंगाईचा पुरस्कार या संबंधित महाशयांना देण्याची गरज आहे.
शालेय शिक्षण विभाग, भ्रष्ट अधिकारी ,संस्थाचालक,बोगस शिक्षकांचे चौकशी समितीचा आदेश बघुन धाबे दणाणलेले होते मात्र चौकशी समितीने दांडी मारल्याने त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मित हास्य उमटले आहे. यामुळे कारवाईचा सूर आळवणारे उपसंचालक औदुंबर उकीरडे यांना तक्रारदार आणि माध्यमांपुढे तोंडघशी पडावे लागले असले तरी चौकशी समितीवर तत्काळ ते प्रशासकीय कारवाई करतीलच हिच अपेक्षा तक्रारदारांना,भरती प्रक्रियेतून डावललेल्या गुणवंत शिक्षकांना आहे.
चौकशी समिती संशयाच्या भोवऱ्यात – अहमदनगर माध्यमिक विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याची चौकशी करणेकामी अद्यापपर्यंत चार वेळा चौकशी समिती नेमण्यात आली.निष्कर्ष काहीच निघाला नाही.मार्च २०२३मध्ये संजय नाईकडे यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला नगरच्या शिक्षण विभागाने माहिती पुरविली नाही.ना समितीवर कारवाई झाली की दोषींवर आता हिच समिती पुन्हा चौकशी करणार मात्र दिलेल्या तारखेला अध्यक्षच चौकशीसाठी आले नाही की मुद्दाम येऊ दिले नाही याबाबत शंका असल्यामुळे चौकशी समितीच सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
प्रतिक्रिया – चौकशी समितीचे अध्यक्ष आले नाही तरी सदस्यांनी चौकशी करायला पाहिजे होती.मात्र त्यांनीही केली नाही आणि दिलेला आदेश डावलण्यात आला याचा अर्थ त्यांना यात रुची नाही अशे समजुन आता चौकशी समितीवर प्रशासकीय कारवाई केली जाईल. (औदुंबर उकीरडे शिक्षण उपसंचालक, पुणे)
प्रतिक्रिया – आज चौकशी होती.मात्र समितीचे अध्यक्षच न आल्यामुळे काय करणार त्यांची वाट बघतोय त्यांचा फोनही लागत नाही.त्या समितीचा मी सदस्य आहे अध्यक्ष आले असते तर मी ही जाऊन बसलो असतो चौकशीला (भास्कर पाटील शिक्षणाधिकारी (प्राथमिक )तथा सदस्य चौकशी समिती अ.नगर)
COMMENTS