Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी ब्रिगेडकडून रक्ताभिषेक आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई निषेधार

ब्राम्हणगाव ग्रामपंचायतवर कोल्हेंचेच वर्चस्व
निळवंडे कालव्यांना गती देवून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवा : ना. आशुतोष काळे
नगरची एमआयआरसी आता झाली रेजिमेंटऐवजी स्कूल

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व समस्त शिवशंभू प्रेमींकडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीसमोर रक्ताचा अभिषेक घालण्यात आला.
यावेळी एका बाजुला छत्रपती संभाजी राजेंसमोर रक्ताचा अभिषेक घालत महसुल प्रशासनाचा निषेध करत रोष व्यक्त करण्यात आला तर दुसर्‍या बाजूला रक्तदान शिबीर घेऊन सामाजिक भान जपण्याच काम संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आले. सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाकडून विलंब झाल्याचे यावेळी तहसीलदार क्षितिजा वाघमारे मॅडम यांनी मान्य करत यापुढे या विषयातील जलद काम करत लवकरात लवकर अतिक्रमण काढणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अरविंद कापसे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, इंजि. शामभाऊ जरे तालुकाध्यक्ष, नाना शिंदे, दिलीप लबडे उपाध्यक्ष, गोरख घोडके कार्याध्यक्ष, विनोद मेहत्रे शहराध्यक्ष, बालुदादा मखरे, मंगेश मोटे, वैभव वनशीव, गणेश पारे, नाना आदी तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुर्तीसमोर रक्ताभिषेक केला. तर शेकडो तरुणांनी यावेळी रक्तदान करुन या आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनासाठी संभाजी ब्रिगेडचे दिलीप आबा वाळुंज, जिल्हा उपाध्यक्ष, सुनिल ढवळे, जिल्हा कार्यधक्ष, संदीप साळवे, कार्याध्यक्ष, राकेश नवले उपाध्यक्ष, सुहास गाडेकर सचिव, राजेंद्र राऊत, अजिज भाई शेखआदी प्रमुख पदाधिकारी तर राजकीय व समाजातील क्षेत्रातील काँग्रेस नेते घनशाम आण्णा शेलार, माजी आमदार राहुल दादा जगताप, शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते, राजेंद्र आबा मस्के, शिवसेना जिल्हाध्यक्षा मिराताई शिंदे, आर पी आई नेते राजाभाऊ जगताप, बाळासाहेब दतारे, मा. नगराध्यक्ष मनोहर दादा पोटे, मा. नगराध्यक्ष एम डी शिंदे, आदिक शेट वांगणे, शिवसेना नेते संतोषजी खेतमालीस, समुकुंदाजी सोनटक्के, संतोष इथापे, दिपक मखरे, तुषार मोटे, अक्षय मखरे, परशुराम, केशव झेंडे, गोपाळराव मोटे पाटिल, शांताराम पोटे, आसिफभाई इनामदार, मौलाना साहेब,हेमंत हिरडे, होरे माऊली, विकास होले बाबू शेठ कोथंबीरे, अक्षय काळे इ मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शंभू प्रेमी उपस्थित होते.

COMMENTS