Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार

दिशा सालियन प्रकरणात नीतेश राणेंची चौकशी

मुंबई ः बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालीयन मृत्यूप्रकरणाला वेग येण्याची शक्यता आहे. कारण याप्रकरणी आता भाजप

मुंबईला लुटू देणार नाही ः अदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल
शीतल म्हात्रेंची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई ः बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालीयन मृत्यूप्रकरणाला वेग येण्याची शक्यता आहे. कारण याप्रकरणी आता भाजप आमदार नीतेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. याप्रकरणी नीतेश यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना मी पोलिसांना सर्व माहिती देण्यास तयार आहे असे ते म्हणालेत. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी बोलतांना राणे म्हणाले की, मुंबई पोलिसांकडून माझ्याशी संपर्क करण्यात आला. दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत प्रकरणी चौकशीसाठी हा संपर्क करण्यात आला. माझ्याकडे 8 जून आणि 13 जूनबाबत अनेक पुरावे आहेत. या सगळ्याबाबत मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे. या हत्येतील आरोपी आजही मोकाट विधानसभेत फिरत आहे. या प्रकरणात तीनवेळा तपास अधिकारी बदलण्यात आले. तपास अधिकार्‍यावर दबाव होता. तेव्हा आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री होते. नारायण राणे आणि माझी पोलिस ठाण्यात चौकशी झाली. त्यावेळी ठाकरेंकडून पोलिसांना वारंवर फोन येत होते. आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियानवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

COMMENTS