Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 जळगाव मधील एका कार्यक्रमात अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांची हजेरी  

जळगाव प्रतिनिधी - चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशन च्या वतीने विविध मान्यवरांना  पुरस्काराने सन्मान करण्यात येतो या कार्यक्रमात पुरस्कार

मुक्त विद्यापीठात पशुसंवर्धन विषयक तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन 
प्राचार्य शेळके यांचा सत्कार म्हणजे माणुसकीचा सन्मान ः प्रताप देवरे
सत्ता संघर्षाचा पेच कायम

जळगाव प्रतिनिधी – चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशन च्या वतीने विविध मान्यवरांना  पुरस्काराने सन्मान करण्यात येतो या कार्यक्रमात पुरस्कारार्थींच्या सन्मान मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या पुरस्कारामध्ये सर्वात जास्त पुरस्कारार्थी महिला होते पुढच्या वर्षी आणखी जर महिला असतील तर आणखी छान वाटेल तसेच 8 मार्चला महिला दिवस आहे महिला उत्तंग भरारी घेत आहे यावरती मराठी सिनेमा सृष्टीचे अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी सांगितले ज्या दिवशी महिला दिवस साजरा करण्याची वेळ येणार नाही त्या दिवशी खरा महिला दिवस असेल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती तर माजी आमदार कैलास पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होती विविध क्षेत्रात नावलौकिक केलेले पुरस्कारार्थी व त्यांचा परिवार मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

COMMENTS