मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप तिच

मुंबई प्रतिनिधी – अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप तिच्यावर आहे, असेही समजते. राखी सावंतला अंबोली पोलिसांनी अटक केल्याचा दावा संबंधित मॉडेलने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे. राखी सावंत ला अटक केल्याचा दावा शार्लिन चोप्रा हिने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केला आहे. राखी सावंत अॅरेस्टेड, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे. याशिवाय तिनं एफआयआरमध्ये कोणकोणत्या कलमान्वये गुन्ह्यांची नोंद केली आहे, हे देखील सांगितले आहे.
शार्लिन चोप्रा हिनं काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अंबोली पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याची माहिती शार्लिननं स्वतः दिली आहे. दरम्यान, राखी सावंतचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळल्याचा दावाही शार्लिननं केला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये शार्लिन चोप्रा हिने पत्रकार परिषद घेतली होती. राखी सावंतने अश्लील व्हिडिओ सर्वांसमोर दाखवल्याचा आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप शार्लिनने केला होता. तसेच पोलिसांत राखीविरुद्ध तक्रारही नोंदवली होती.
COMMENTS