मुंबई प्रतिनिधी - छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. जुईच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा

मुंबई प्रतिनिधी – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. जुईच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर तिने स्वत:च लग्नाची तारीख सांगितली आहे. जुई गडकरी पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. जुईने मंगळागौरीचं शुटिंग सुरु असताना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे. जुईने लग्नाची तारीख जरी सांगितली असली तरी तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आणि त्याच्याबद्दल काहीच सांगितले नाही. त्यामुळे तो नेमका आहे तरी कोण? हे जाणून घेण्यासाठी जुईचे चाहते खूपच उत्सुक आहेत जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती सायलीची भूमिका साकारत असून ती सर्वांना प्रचंड आवडत आहे. ‘बिग बॉस’नंतर जुई गडकरीने आजारपणामुळे ब्रेक घेतला होता. पण तिने ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून पुनरागमन केलं. या मालिकेच्या माध्यमातून ती पुन्हा घराघरामध्ये पोहचली आहे. नुकताच या मालिकेत मंगळागौरीचं शूटिंग दाखवण्यात आलं. यावेळी जुई गडकरी आणि तिचा सहकलाकार अमित भानुशाली यांनी ‘हंच मीडिया’ला मुलाखत दिली. याचवेळी जुईने तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये लग्न कधी करणार याची तारीख जाहीर केली.
COMMENTS