९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय मालिका ‘करिश्मा का करिश्मा’ जवळपास सर्वांच्याच लक्षात असेल. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा बालकलाकार झनक शुक्ल

९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय मालिका ‘करिश्मा का करिश्मा’ जवळपास सर्वांच्याच लक्षात असेल. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा बालकलाकार झनक शुक्ला त्या काळात घराघरात नावाजलेली होती. झनक शुक्ला हिला ९० च्या दशकातील मुले करिश्मा या नावाने ओळखत होते. अभिनेत्रीने ‘करिश्मा का करिश्मा’ आणि कल हो ना हो’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर, अलीकडेच अभिनेत्रीने तिचा प्रियकर स्वप्नील सूर्यवंशीसोबत एंगेजमेंट साखरपुडा केला आहे. झनकने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर त्यांच्या साखरपुडयाचे काही फोटो शेअर केले आहेत. झनकच्या या पोस्टवर तिच्या सहकलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सृती झा, कंवर ढिल्लन, मोहित हिरानंदानी, अविका गोर यांच्यासह अनेकांनी या पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. झनक शुक्लाने शाहरुखच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटात काम केले होते. याशिवाय ती ‘वन नाइट विथ द किंग’ या हॉलिवूड चित्रपटातही दिसली आहे.
COMMENTS