अभिनेता संतोष जुवेकरचं गोविंदा पथकांना आवाहन

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेता संतोष जुवेकरचं गोविंदा पथकांना आवाहन

संतोष जुवेकरने व्हिडिओच्या माध्यमातून गोविंदा पथकांना शुभेच्छा देत विनंती देखील केली आहे.

अभिनेता संतोष जुवेकर(Santosh Juvekar) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अनेकदा तो राजकीय - सामाजिक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतो. आता दोन दिवसांवर दही

पतंग उडवतायं जरा जपून, सावधानता बाळगा
पेटत्या होळीमध्ये लहान मुलाला उचलून टाकलं | DAINIK LOKMNTHAN
संगणक कर्मचार्‍यांना कनिष्ठ लिपिक पदाची लॉटरी

अभिनेता संतोष जुवेकर(Santosh Juvekar) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अनेकदा तो राजकीय – सामाजिक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतो. आता दोन दिवसांवर दहीहंडीचा उत्सव जवळ आला आहे. संतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांनी मानवी मनोरे रचले आहेत. संतोष जुवेकरने व्हिडिओच्या माध्यमातून गोविंदा पथकांना शुभेच्छा देत विनंती देखील केली आहे. दहीहंडी हा सण आहे आपला. तो सणासारखाच साजरा करा. त्याची स्पर्धा करू नका. मज्जा करा पण काळजी घ्या,” असे कळकळीचे आवाहन त्याने केले आहे.

COMMENTS