Homeताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेता सलमान खानने मिस्ट्री गर्ल सोबतचा फोटो केला शेअर

मुंबई प्रतिनिधी - सलमान खान लग्न कधी करणार याकडे चाहत्यांसह अनेकांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे बॉलिवूडचे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. मात्र

दीपिका पादुकोणचे नव्या व्यवसायात पदार्पण
अभिनेत्री अमिषा पटेल भलत्याच अडचणीत.
हिजाबबद्दलचा कोर्टाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा- देवेंद्र फडणवीस | LOKNews24

मुंबई प्रतिनिधी – सलमान खान लग्न कधी करणार याकडे चाहत्यांसह अनेकांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे बॉलिवूडचे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. मात्र सलमान काही लग्नाचं नाव घेताना दिसत नाही. अशातच सलमान खानने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पोस्ट केलेल्या फोटोत सलमान खान एका मुलीसोबत दिसत आहे. त्याने या फोटोला रंजक कॅप्शन देखील दिलं आहे. या फोटोमागची कहाणी जाणून घेऊया. सोशल मीडियावर नुकताच सलमान खानने एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. मात्र या फोटोत या मुलीचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांना देखील पडला आहे. या फोटोला त्याने “मी कायम तुझ्या पाठीशी असेन” असं कॅप्शन दिल्याने चाहते आणखी संभ्रमात पडले आहेत. 

या फोटोत सलमान आणि ती मुलगी पांढऱ्या सुटमध्ये दिसत आहेत. त्यांनी महागडं जॅकेट घातलं आहे, ज्यावर ‘27/12’ही तारीख लिहिली आहे. ज्यावरुन चाहत्यांना सलमानच्या वाढदिवसाची आठवण आली. या फोटोवर “माझ्या काळजाचा तुकडा” असंही लिहीलं आहे. या फोटोला अवघ्या काही वेळात लाखो लाईक्स मिळाले आहेत

COMMENTS