मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड विश्वातील अभिनेता रणबीर कपूरला ईडीने आज समन्स बजावलं आहे. त्यामुळे या अभिनेत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड विश्वातील अभिनेता रणबीर कपूरला ईडीने आज समन्स बजावलं आहे. त्यामुळे या अभिनेत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका ऑनलाईन गेमिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. महादेव गेमिंग अॅप्लिकेशन जाहिरातीत हा अभिनेता संबंधित अॅप्लिकेशनचं प्रमोशन करत होता. दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याला चौकशीकरता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अभिनेता रणबीर कपूरला ईडीने समन्स बजावल्यानंतर रणबीर कपूरच्या चाहत्यावर्गात नाराजीचं वातावरण आहे. मात्र ६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याची चौकशी होणार आहे. त्यामुळे नेमकं आता पुढे काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ईडीनं समन्स बजावल्यानंतर अद्याप अभिनेता रणबीर कपूरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे दिसतंय.
COMMENTS