मुंबई ः मराठी सिनेसृ्ष्टीतील प्रसिद्ध अभिनेते क्षितीज झारापरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मुंबई ः मराठी सिनेसृ्ष्टीतील प्रसिद्ध अभिनेते क्षितीज झारापरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कर्करोगामुळे त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. दादरमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक महिन्यांपासून ते आजाराशी लढत होते. मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
COMMENTS