Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी कार्यकर्ते सरसावलेय; किनवट मध्ये राष्ट्रवादी पुन्हा

किनवट प्रतिनिधी - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असले तरी किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सेनापतीच्या अनु

प्रसिद्ध पार्श्वगायक हृदयविकाराच्या झटक्यानं निधन | LOKNews24
राज्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी
प्रसिद्ध कंधारच्या उरुसाला उत्साहात सुरवात, हजारो भाविक संदल मध्ये सहभागी

किनवट प्रतिनिधी – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असले तरी किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सेनापतीच्या अनुपस्थितीमध्ये सरदारांनी गड राखत बुथ बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे किनवट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुन्हा ’कमबॅक’ होणार असून त्यानिमित्ताने माजी आमदार प्रदीप नाईक यांची जनता व कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ जुळलेल्या नातेसंबंधाची प्रचिती  पहावयास मिळत आहे.
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात सलग हायट्रिक करणारे प्रदीप नाईक यांची गत पंचवार्षिक मध्ये अंतर्गत असंतोषामुळे पाढाव झाला परंतु ठेच लागल्यावर शहाण्या होणार्‍या कार्यकर्त्यांना चूक लक्षात आल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या तळागाळातील सदस्या पासून कार्यकर्त्यापर्यंत सर्वांनी पुन्हा आपला ’गड’ परत मिळवण्याचा चंग बांधला आहे. त्यातच पराभवानंतरही प्रदीप नाईक हे जनसंपर्कात आहेत. त्यामुळे जनसामान्यांना आजही ते आपले नेते वाटतात. अशात मतदारसंघात भरीव संपर्क करण्याची आपणाला संधी मिळाली असल्याचे म्हणत नाईकांनी आपल्या कामाला अधिक गती दिली. त्यामुळे दुरावलेला कार्यकर्ताही त्यांच्या अधिक जवळ आला. राणोमाळी विखुरलेला त्यांचा पक्ष पुन्हा एकत्र येऊ लागला आहे. अशात एक बुथ 20 युथ या कार्यक्रमाला पक्षाने सुरुवात केली आहे. प्रदीप नाईक यांच्या तालमीत व मार्गदर्शनात तयार झालेले कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीची वाट न पाहता कामाला लागले आहेत. त्यामुळे संबंध मतदारसंघ राष्ट्रवादीमय दिसत आहे. तर नाईक साहेबांच्या अनुपस्थिती मध्ये त्यांचे सरदार एकलव्याप्रमाणे त्यांच्या शिष्टेचे अनुपालन करत मोठ्या प्रमाणावर बूथ कमिट्या स्थापन करून पुन्हा कमबॅक करण्याचा पाया रचताना दिसत आहेत. नाईकांची त्यांच्या कार्यकर्त्याबाबत असणारी आपुलकी व नातेसंबंध यातून स्पष्ट होत असून खरोखर  च नेता म्हणून जनता प्रदीप नाईकाकडे मोठ्या आशेने पाहत आहे एवढे मात्र खरे

COMMENTS