Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभाग सहामधील भाजपाच्या चारही उमेदवारांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

नांदेड ।  प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांनी मिळवलेला दणदणीत विजय हा

पराभवाने खचायचे नाही, काम सुरूच ठेवायचे : अजित पवार
निम्म्या महापालिकेत महिला महापौर!
मुंबईचा महापौर शिवसैनिकच व्हावा ः शिंदें

नांदेड ।  प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांनी मिळवलेला दणदणीत विजय हा केवळ आकड्यांचा खेळ नव्हता, तर तो विश्वास, परिश्रम आणि संघटनशक्तीचा उत्सव ठरला. या प्रभागातील निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण नांदेडचे लक्ष लागले होते. या प्रभागातील भाजपाचे उमेदवार सौ. शीला किशोर भवरे, सौ.वैशाली मिलिंद देशमुख, राजेश यन्नम आणि आशिष नेरलकर यांच्या विजयाने संपूर्ण प्रभागात आनंदोत्सवाचे वातावरण पसरले आहे. ढोल-ताशांच्या गजरात, कार्यकर्त्यांच्या जल्लोषात, भाजपाच्या विजयाचा जयजयकार करून आणि मतदारांच्या आनंदोत्सवातून हा विजय साजरा करण्यात आला. यावेळी हजारो मतदार व कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
या यशामागे प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांची, भाजपा महानगर तसेच जंगमवाडी मंडळातील पदाधिकारी, चारही उमेदवारांच्या हितचिंतकांची अहोरात्र मेहनत ठळकपणे दिसून आली. घराघरांत पोहोचणारा संवाद, महिलांची शिस्तबद्ध व नियोजनाने परिपूर्ण असणारी डोअर-टू-डोअर प्रचारयंत्रणा आणि पदाधिकार्‍यांची शिस्तबद्ध कामगिरी-या सर्वांनी मिळून विजयाचा पाया मजबूत केला. भाजपाचे मजबूत संघटन, संयम आणि सेवाभाव यांची सांगड घालत कार्यकर्त्यांनी तन-मन-धन अर्पण केले आणि त्याचे फळ मतपेट्यांतून उमटले व हा विजय साकार झाला.  या विजयाला नेतृत्वाचा ठसा लाभला, असे मतदार स्पष्टपणे व्यक्त करताना दिसले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार आणि मनपा निवडणूक प्रमुख अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, भाजप महानगराध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजूरकर तसेच मिलिंद देशमुख यांच्या मार्गदर्शनावर मतदारांनी विश्वासाची मोहोर उमटवली. हा कौल नेतृत्वावरच्या श्रद्धेचा आणि विकासाभिमुख राजकारणाच्या स्वीकाराचा द्योतक ठरला आहे.  विजयानंतर चारही नगरसेवकांनी मतदारांचे आभार मानत जबाबदारीची जाणीव व्यक्त केली. प्रभागातील प्रत्येक वसाहतीतील प्रश्न सोडविणे हे आमचे सामूहिक कर्तव्य आहे. पुढील पाच वर्षे आम्ही प्रामाणिकपणे जनसेवा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, ड्रेनेज, पक्के रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता-या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत विकासाचा वेग वाढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रभाग सहामधील हा विजय नांदेडच्या प्रगतीकडे नेणारा विश्वासाचा संदेश देतो. मतदारांनी दिलेला कौल हा अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आहे-असा सूर या आनंदोत्सवात स्पष्टपणे उमटला.

COMMENTS