Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी लाँग मार्चला भाकपचा सक्रीय पाठिंबा

अ‍ॅड. लांडे यांचे स्पष्टीकरण

अहमदनगर/प्रतिनिधी ः शेतकर्‍यांच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या नेतृत्वाखाली मुंबईला निघालेल्या शेतकरी ल

घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकीदारांनी आणला महापालिकेला वात ; 88 हजारावर नगरकरांकडे तब्बल 203 कोटीची येणे बाकी
जामखेड बाजार समितीत ईश्‍वर चिठ्ठीचा कौल भाजपला
किर्तनाच्या क्लिप्स YouTube वर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्मतील | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ः शेतकर्‍यांच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या नेतृत्वाखाली मुंबईला निघालेल्या शेतकरी लाँग मार्चला भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांनी एकजुटीने या आंदोलनाचे समर्थन करुन पाठिंबा देण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी केले आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने तात्काळ शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनावर सरकारने कोणत्याही प्रकारची दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

यासंदर्भात अ‍ॅड. लांडे यांनी सांगितले की, राज्यात सत्तेवर आलेले भाजपच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकार व याअगोदरही सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्यांची सातत्याने उपेक्षाच केलेली आहे. याविरुध्दचा असंतोष प्रकट करणार्‍या या तिसर्‍यांदा निघालेल्या शेतकरी-शेतमजूर लाँग मार्चला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय पाठिंबा आहे. यावेळी करण्यात आलेल्या 17 मागण्या शेतकरी व शेतमजुरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या आहेत. वनाधिकार कायदा अस्तित्वात येवून 16 वर्षे उलटून गेल्यानंतर देखील फॉरेस्ट जमिनी कसणार्‍या शेतकर्‍यांच्या नावे करण्यात आलेल्या नाहीत. कॉर्पोरेट कंपन्यांना मात्र सर्व नियम-कायदे धाब्यावर बसवून जमिनी देणारे सरकार आदिवासी शेतकर्‍यांची मात्र 16 वर्षे उपेक्षा करीत आहे. यापूर्वीच्या सरकारांनी देखील शेतकर्‍यांची उपेक्षाच केली असल्याचा आरोप भाकपच्यावतीने करण्यात आला आहे.

कांदा, सोयाबीन, कापूस, हरभरा या सर्व प्रमुख पिकांचे भाव केंद्रातील भाजप सरकार तसेच कॉर्पोरेट भांडवलदारांच्या पाठिंब्यावर चालणार्‍या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे कोसळले आहेत. 13 महिने दिल्लीच्या सीमेवर चाललेल्या आंदोलनानंतर नरेंद्र मोदी सरकारने शेतकर्‍यांना हमी भावाचा अधिकार देणारा कायदा करण्याचे आश्‍वासन अंमलात न आणता भाजपाने शेतकरी आंदोलनाची फसवणूक केली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये उदध्वस्त होणार्‍या शेतकर्‍यांना व शेतमजुरांना तुटपुंजी मदत देखील वेळेवर दिली जात नाही. पीक-विमा कंपन्यांनी सरकारच्या वरदहस्तामुळे शेतकर्‍यांची सातत्याने फसवणूकच केली आहे. देशभरात 13 विमा कंपन्यांनी एक लाख कोटी रुपयांना लुटले असल्याचा आरोप अ‍ॅड. लांडे यांनी केला आहे.

कांद्याला अत्यंत तुटपुंजे अनुदान घोषित करून सरकार शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळीत आहे. किमान 1000 रुपये प्रति क्विंटल गरज असताना 300 रुपयांची घोषणा संतापजनक आहे. तसेच सर्वांसाठी घरे या घोषणेचा बोजवारा उडाला आहे. कर्जबाजारी शेतकरी-शेतमजुरांची घरे सरफेसी कायद्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने कंपन्या ताब्यात घेत आहेत. तुटपुंज्या निधीवर असलेल्या घरकुलांच्या योजना अमलातच आणल्या नसल्याचेही अ‍ॅड. लांडे यांनी म्हटले आहे.

COMMENTS