मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे प्रमुख यांनी राज्यात बुधवारपासून मशीदीसमोरील भोंगे उतरवा अन्यथा तेथे हनुमान चालीसाचे पठण करण्
मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे प्रमुख यांनी राज्यात बुधवारपासून मशीदीसमोरील भोंगे उतरवा अन्यथा तेथे हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात बुधवारपासून कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये, म्हणून पोलिस अॅक्शन मोडमध्ये आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर पोलिस महासंचालक माध्यमांना संबोधित करतांना म्हणाले की, कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या 87 तुकड्या आणि 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी 15 हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून 13 हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंठक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती रजनीश सेठ यांनी दिली. सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणं पोलिसांची जबाबदारी आहे. कोणीही ते बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं मी राज्यातील जनतेला आवाहन करतो, असंही ते म्हणाले. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत, असे रजनीश सेठ यांनी सांगितले. 15 हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून 13 हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती रजनीश सेठ यांनी दिली आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी भाषणाचा अभ्यास केला आहे. आवश्यक ती कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. जी कारवाई करायची आहे ती आजच केली जाईल. यासंबंधी कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.
आवश्यकता वाटल्यास राज ठाकरेंवर कारवाई
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बैठकीनंतर पोलिस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केलेला आहे. आवश्यकता वाटल्यास राज ठाकरेंवर पोलीस कारवाई करण्यात येईल. कोणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल, अशीही माहिती पोलीस महासंचालक यांनी दिली आहे.
राज ठाकरेंवर अजामीनपत्र गुन्हा दाखल
मनसेच्या औरंगाबाद येथील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या नियम व अटीचा भंग केल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांच्यासह ज्यांच्या नावाने परवानगी घेण्यात आली होती त्या मनविसेचे जिल्हाध्यक्ष राजीव जेवळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस दलाचे जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, पोलीस उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून कलम 116, 117, 153 भादंवि 1973 सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
COMMENTS