Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील दोन बेकायदेशीर शाळांवर कारवाई

पुणे ः शाळा सुरु करण्यासाठी नियम व अटी यांच्या कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता, अनाधिकृत भरमसाठ फी वसूल करुन, शाळा अनाधिकृत असूनही शाळा अधि

कोपरगावचा किराणा व्यापारी हा देशाच्या अर्थचक्राला गती व दिशा देणारा –  तनसुख झांबड
बेकिंग व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

पुणे ः शाळा सुरु करण्यासाठी नियम व अटी यांच्या कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता, अनाधिकृत भरमसाठ फी वसूल करुन, शाळा अनाधिकृत असूनही शाळा अधिकृत आहे असे भासवून अनाधिकृत शाळा अधिकृत म्हणून चालवून शासनास आवश्यक असलेला महसूल बुडवून शासनाची, पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या दोन शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे केंद्रप्रमुख सुरेश लक्ष्मण साबळे (वय-47) यांनी पोलिसांकडे हिंजवडीतील सिम्बॉयसिस कॉलेज शेजारील बुधराणी नॉलेज फाऊंडेशन संचालित ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कुलचे मुख्याध्यापक सिझी अली खान, फाऊंडेशनचे मालक गौतम बुधराणी व शैक्षणिक संस्थेचे संचालक व चालक यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार सुरेश साबळे हे केंद्रप्रमुख असल्याने त्यांचे अखत्यारीत शाळांची तपासणी ते करत होते. त्यावेळी बुधराणी शाळेकडे कोणत्याही शाळा चालवण्यासाठी आवश्यक शासन मान्यता कागदपत्रे नसल्याचे दिसून आले. सदरची शाळा सप्टेंबर 2022 पासून सुरु झाली असून शाळेत इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग असून एकूण 116 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सदर विद्यार्थ्यांकडून अनाधिकृतपणे भरमसाठ फी देखील वसूल करुन पालकांची फसवणूक करण्यात आली आहे. अशाचप्रकारे मुळशी तालुक्यातील माण येथील रुडीमेट इंटरनॅशनल स्कुर या शाळेवर देखील हिंजवडी पोलिस ठाण्यात भादंवि 420, 465, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक विनीत भारद्वाज व एक महिला आरोपी यांचेवर याबाबत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधित रुडीमेंट इंटरनॅशनल स्कूल अनाधिकृत असताना ते अधिकृत असल्याचे भासवून विद्यार्थ्यांचे भरमसाठ फी घेऊन पालकांची व शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे.

COMMENTS