देवळाली प्रवरा ः राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या विशेष पथकातील पो. काँ. राहुल यादव या पोलिस पोलिस कर्मचार्याने आदिवासी
देवळाली प्रवरा ः राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या विशेष पथकातील पो. काँ. राहुल यादव या पोलिस पोलिस कर्मचार्याने आदिवासी भिल्ल समाजातील महिलांना जातीवाचक शिवीगाळ करुन करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने पो.काँ.राहुल यादव त्यांच्यावर तात्काळ अनुसूचीत जाती-जमाती अँक्टनुसार गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब बर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत एकलव्य संघटनेच्या राहुरी तालुक्यातील पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री व जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे राहुरी पोलिस ठाण्यातील पो.काँ.राहुल यादव या पोलिसाने आदीवासी भिल्ल समाजाच्या सोनाली अनिल गायकवाड यांच्या घरी कोणीही पुरुष मंडळी नसतांना देखील जबरदस्तीने घरात घुसले घरातील महिलांना सोनाली अनिल गायकवाड, अश्विनी सुरेश गायकवाड, मोहिनी बाबासाहेब गायकवाड यांना आर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली व म्हणाला की, तुम्ही लई माजलेत, मी तुमच्याकडे पाहतोच अशी धमकी देऊन आमच्या आदिवासी महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक केली. तसेच सोनाली अनिल गायकवाड हिला आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन तुझ्या नवर्यावर खोटे गुन्हे दाखल करुन त्याला जेलमध्ये सडवीन आणि तुमची पुरती जिरवुन टाकीन अशी धमकी दिली.हा पोलिस कर्मचारी राहुल यादव हा रात्री अपराञी दारुच्या नशेत आदिवासी वस्तीमध्ये घुसून आमच्या महिलांना व तरुण मुलींना धाक दाखवून धमकी देत असतो. मी पोलिस असुन माझे तुम्ही काहीच वाकडे करु शकत नाही. तुमचा बेत पाहतोच अशा धमक्या देत असतो. आदीवासी भिल्ल समाजाला जगणे मुश्कील केले आहे. देवळाली प्रवरा येथील आदिवासी माहिलांच्या जिवीतास मोठा धोका निर्माण झाला आहे. या पोलिस कर्मचार्या पासुन भविष्यात आदिवासी महिलांच्या अब्रुचाही प्रश्न निर्माण झालेला असल्याने पोलिस कर्मचारी राहुल यादव याचेवर त्वरीत अनुसूचीत जाती-जमाती अँक्ट नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. देवळाली प्रवरा शहरातील अवैध धंद्यावर कायदेशीर कारवाई करुन बंद करण्यात यावे.राहुल यादव या पोलिस कर्मचार्यावर अनुसूचीत जाती-जमाती अँक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अन्यथा आदीवासी समाज कोणतीही पुर्व सुचना न देता राहुरी पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषण करण्यात येईल. निवेदनावर एकलव्य आदीवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब बर्डे, नामदेव पवार, जयेश माळी, अनिल गायकवाड, विशाल बर्डे,संभाजी साळवे, विठ्ठल बर्डे, तुषार गायकवाड, सतिष डोळस, अविनाश माळी, सोनाली गायकवाड आश्वीनी गायकवाड, मोहिनी गायकवाड, सतिष भांड, नाना लोखंडे, सागर उल्हारे, किशोर गायकवाड, सुरज विधाटे, रविंद्र बर्डे, रविंद्र खैरे, अश्विन खैरे, मिना गायकवाड, शबरा गायकवाड, किरण बर्डे, अमोल गायकवाड, संदीप चव्हाण आदींच्या सह्या आहेत.
COMMENTS