Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापुरमध्ये अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई

साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त बेलापूर पोलिसांची कारवाई

बेलापूर/प्रतिनिधी ः प्रवरा नदीपात्रातुन होत असलेल्या बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर बेलापूर पोलिसांनी कारवाई करुन सात लाख पन्नास हजाराचा म

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, नारायण राणे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल..|सुपरफास्ट २४ | LokNews24|
ढोलेवाडी व बोरबन ग्रामपंचायत बिनविरोध
तळेगाव मळे ग्रामस्थांची 178 व्या सप्ताहाची मागणी

बेलापूर/प्रतिनिधी ः प्रवरा नदीपात्रातुन होत असलेल्या बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर बेलापूर पोलिसांनी कारवाई करुन सात लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
उक्कलगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असून लगेच गेल्यास वाळूची वाहने मिळून येतील अशी गुप्त खबर श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली. त्यांनी तातडीने आपले वरिष्ठ जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलिस नाईक गणेश भिंगारदे पोलिस नाईक रामेश्‍वर ढोकणे, पोलिस काँन्स्टेबल हरिष पानसंबख, नंदु लोखंडे यांना सोबत घेवुन छापा टाकला. यावेळी तीन वहाने वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर वाळू वहातुक करताना आढळून आली. पहिल्या घटनेत रमेश धनवटे व अभिषेक किशोर गायकवाड रा उक्कलगाव हे प्रवरा नदीपात्रात नाव घाटाजवळ टाटा झेनाँन गाडी क्रमांक एमएच 41 जी 9079 मधुन अवैधरित्यावाळु वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी 2 लाख पन्नास हजार रुपये किंमतीची वाळू वाहतूक करणारी गाडी व त्यातील पाच हजार रुपये किंमतीची वाळू असा दोन लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबतची खबर पोलिस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दिली.
दुसर्‍या घटनेत गणेश फुलपगार उक्कलगाव व सागर साळवे राहणार बेलापूर हे उक्कलगाव शिवारात झेनाँन क्रमांक एमएच 19 एस 7394 मधुन अवैधरित्या वाळू वाहतूक करतांना आढळून आले. पोलिसांनी दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची वाळू वाहतूक करणारी गाडी व त्यातील पाच हजार रुपयांची वाळू असा दोन लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तिसर्‍या घटनेत नाना बाळू गुंजाळ हा एक पांढर्‍या रंगाचा टाटा झेनाँन क्रमांक एमएच 15 ईजी 170 किंमत रुपये दोन लाख पन्नास हजार व त्यातील पाच हजार रुपयांची वाळू असा दोन लाख पंच्चावन्न हजार रुपयांचा असा एकुण 7 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून संबधितांविरोधात भादंवि कलम 379 सह भारतीय पर्यावरण संरक्षक कायदा कलम 3/15 प्रमाणे कारवाई करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्‍वर ढोकणे हे करत आहेत. बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  व सर्व सदस्यांनी गाव व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पोलीसांनी मोठी कारवाई केली असून गावातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी बेलापूर ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS