Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरेगावमध्ये अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

देशी भिंगरीसह गावठी दारू उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव हद्दीत गोदावरी उजव्या कँनाल लगत अवैध देशी भिंगरी व गावठी दारु विक्रेत्यावर अहमदनगर राज्य उत्पादन

राज्य सरकार विकत घेणार तोटयातील कारखाने
दैनिक लोकमंथन l बोठेशी संबंधित ‘त्या’ फोनचे फॉरेन्सिक अहवाल प्रतीक्षेत
आमदार काळेंनी केलेली विकासमकामे जनतेपर्यंत पोहचली पाहिजे – संदीप वर्पे

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव हद्दीत गोदावरी उजव्या कँनाल लगत अवैध देशी भिंगरी व गावठी दारु विक्रेत्यावर अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील उपाधिक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव विभागाने कारवाई करत देशी भिंगरीच्या कार्टरसह गावठी दारू जप्त करत दोन विक्रेत्या वर 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने तालुक्यातील अवैध व्यावसायिका खळबळ उडाली मात्र पथक माघारी फिरताच नव्या जोमाने व्यवसाय पुन्हा सुरू झाला.
उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी अहमदनगर जिल्हात 21 सप्टेंबर 2022 रोजी शासकीय विश्राम ग्रुह येथे घेतलेल्या आढावा बैठकीत महसुली उत्पन्न वाढवण्याच्या द्रुष्टीने अवैध दारू निर्मिती वाहतूक व विक्री करणार्‍या विरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात येवुन अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशे आदेश अधिक्षक यांना दिलेले असतांना कोपरगाव तालुक्यात मंत्र्यांच्या आदेशानुसार सुरेगावात कारवाई करण्यासाठी अधिकार्यांना सहा महिन्याचा कालावधी लागला राजरोसपणे हाँटेल च्या नावाखाली सर्व प्रकारचे अवैध मद्य विक्री करणार्‍या बड्या धेडांवर कारवाई न करता दोन छोट्या विक्रेत्या वर  65 ई प्रमाणे कोपरगाव उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई संशयाच्या भोवर्यात सापडली आहे . गुरुवार दिंनाक 16 मार्च रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग कोपरगाव निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेगाव गोदावरी उजव्या कँनाल लगत अवैध देशी व गावठी दारू विक्री करणार्‍या महिलेसह एका वर गुन्हा दाखल करण्यात आला तर कारवाई दरम्यान एक विक्रेता पळुन गेल्याने वरील दोघावर 65 ई प्रमाणे कारवाई करण्यात आली मात्र कारवाई पथक माघारी फिरताच पुन्हा अवैध धंदे जोरात चालू होते अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांना सक्त आदेश देवून गुन्हेगारी मोडीत काढण्या साठी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना केल्या असतांना आरोग्यास अपायकारक व सामाजिक स्वास्थ बिघडवणार्या गावठी दारू वर उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई स्वागतार्ह ठरत आहे तर कोपरगाव ग्रामीण पोलीस अवैध धंद्याना पाठीशी घालत असल्याचा ग्रांमस्थाचा आरोप आहे अवैध व्यवसायामुळे सुरेगाव कोळपेवाडी परिसरात सातत्याने दुकान फोडी च्या घडत आहे  महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत आरोग्यास अपायकारक असणारा गुटखा मुंबई कल्याण मटका बिंगो लाँटरी पत्याचे क्लब अवैध देशी विदेशी मद्या बरोबर गावठी दारू विक्रेत्यांनी धंद्यात जम बसवल्याने गुन्हेगारी मध्ये वाढ झाल्याने परिसरातील  कायदा सूव्यवस्था धोक्यात आली आहे  कोपरगाव ग्रामीण पोलीस अवैध धंद्याना पाठीशी घालत असल्याचा ग्रामस्थाचा आरोप आहे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने परिसरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी पुढे येत आहे.

COMMENTS