Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला

मुंबई ः मुंबईच्या वडाळा टीटी पोलिसांच्या हद्दीत रविवारी धक्कादायक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फ

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार
दोन सराईत टोळ्यांतील 17 जणांवर कारवाई l LOKNews24
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही घरांना तेजी कायम

मुंबई ः मुंबईच्या वडाळा टीटी पोलिसांच्या हद्दीत रविवारी धक्कादायक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. व्यंकटेश टन्नीर (वय, 69) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पत्नीसह वडाळा टीटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहायला होता.

COMMENTS