Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांजरीसोबत खेळतो म्हणून कुत्र्यावर अ‍ॅसिड हल्ला

मुंबई : एकतर्फी प्रेमातून तरूणींवर अ‍ॅसिड हल्ला होण्याच्या अनेक घटना समोर येतात, मात्र मुंबईतील एका महिलेने कुत्र्यावर अ‍ॅसिड हल्ला केल्याचा धक्क

पुण्यातील जुना बाजार परिसरात दुकानांना मोठी आग
मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडले अन् चोरट्याने प्राध्यापिकेची पेंडल पळविले !
‘जीपीएस’ लावून प्रियसीचा पाठलाग

मुंबई : एकतर्फी प्रेमातून तरूणींवर अ‍ॅसिड हल्ला होण्याच्या अनेक घटना समोर येतात, मात्र मुंबईतील एका महिलेने कुत्र्यावर अ‍ॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित कुत्रा हा मांजरींसोबत खेळतो आणि त्यांच्या मागे लागतो, त्रास देतो या कारणावरुन महिलेने कुत्र्यावर अ‍ॅसिड हल्ला केल्याचे समोर आले आहे. मुंबई पश्‍चिम उपनगरातील मालाड मालवणीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. मालवणीमधील सामनानगर परिसरातील स्वप्नपूर्ती या इमारतीमध्ये हल्ला करणारी महिला राहते. सबिस्ता सुहेल अन्सारी असे महिलेचे नाव आहे. या 35 वर्षीय महिलेकडून कुत्र्यावर अ‍ॅसिड अटक करण्यात आला.

COMMENTS