Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिध्दार्थ तागडने मिळवलेले यश शाळा व संस्थेसाठी भुषणावह ः अ‍ॅड. देशपांडे

अहमदनगर ः सर्वसामान्य परीस्थिती असताना मिळवलेले यश नक्कीच भूषणावह बाब आहे योग्य नियोजन तसेच अभ्यासात सातत्य असल्यास यश मिळतेच सिध्दाथ यांच्या  यशाने

संत ज्ञानेश्‍वर शाळेच्या100 टक्के निकालाची परंपरा कायम
सुरेशनगरमध्ये मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर उत्साहात
आजचे राशीचक्र सोमवार,o६डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24

अहमदनगर ः सर्वसामान्य परीस्थिती असताना मिळवलेले यश नक्कीच भूषणावह बाब आहे योग्य नियोजन तसेच अभ्यासात सातत्य असल्यास यश मिळतेच सिध्दाथ यांच्या  यशाने शाळेचे नावं मोठे झाल आहे सिध्दार्थने केलेल्या कष्ट,मेहनतीचे हे फळ आहे हे यश विदयार्थ्याकरीता प्रेरणादायी आहे. सिध्दार्थ तागडने मिळवलेले यश शाळा व संस्थेसाठी भुषणावह आहे असे प्रतिपादन माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग शालेय समिती चेअरमन अ‍ॅड. किशोर देशपांडे यांनी केले.
सावेडीतील श्री समर्थ विदया मंदिर प्रशालेचा माजी विदयार्थी सिध्दार्थ तागडने युपीएससी परीक्षा पास झाल्याबददल संस्था व शाळेच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग शालेय समिती चेअरमन अ‍ॅड. किशोर देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भा. ल. जोशी, उपाध्यक्ष दिपक ओहोळ, सचिव  तथा शालेय समिती चेअरमन सुरेश क्षीरसागर, सचिव प्र. स. ओहोळ, सचिन क्षीरसागर, स्वप्नील कुलकर्णी, मुख्याध्यापक दुर्योधन कासार,मुख्याध्यापिका संगीता जोशी,पर्यवेक्षिका वसुधा जोशी, व तागड दाम्पत्य आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS