Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोपीचा पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न

जामखेड शहरातील घटना ः स्वसंरक्षणासाठी पोलिस निरीक्षकांनी केला गोळीबार

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड शहरातील तपनेश्‍वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. अशी माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी आरोपीच्या शोधार्

तहसील विभाजना विरोधात जनआंदोलनासोबतच न्यायालयात जाण्याचा निर्णय ; आ. बाळासाहेब थोरात
सेवाभावी पुरस्कार आणि ग्रंथप्रकाशनच खरे पुण्यस्मरण ः काका कोयटे
वापरात नसलेल्या खात्यातून परस्पर काढले पैसे

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड शहरातील तपनेश्‍वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली. अशी माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ धाव घेतली. यावेळी खर्डा रस्त्यावर एका हॉटेलसमोर बसलेल्या आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी प्रसंगानुसार स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार केला. तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिस यशस्वी झाले. गोळीबारात जखमी आरोपीला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. याप्रकरणी पो. कॉ. संतोष नामदेव कोपनर यांनी फिर्याद दिली की, 19 जुलैला आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुने सर्व (रा. सारोळा ता. जामखेड) यांनी जामखेड शहरातील तपनेश्‍वर रोड येथे इसम नामे अदनान जहर शेख, (रा. तपश्‍वररोड, जामखेड ) यांचे डोक्याला पिस्टल लावून त्याच्या ताब्यातील अर्टिगा गाडीची (एमएच 12 केटी 4795) चोरी केली होती. आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार, शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम डुचे यांचा शोध घेत  असताना जामखेड ते खर्डा असे जाणारे रोडलगत असलेले हॉटेल साई समोरील मोकळ्या पटांगणात आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार याने त्याचे कमरेला असलेल पिस्टल बाहेर काढुन आम्हाला जीवे ठार मारण्याच्या उददेशाने त्याचे हातातील पिस्टल पोलिसांवर रोखले. पिस्टलचे ट्रिगर दाबुन गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पथकातील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपीला तुझ्यां हातातील पिस्टल खाली टाक, तुम्ही तिघेही सरेंडर करा असे आवाहन करुन देखील आरोपीनी त्यांचेकडील पिस्टल मधुन फायर करण्याचे उददेशाने पिस्टल पुन्हा कॉक करत आमच्याशी झटापट करत सरकारी कामात अडथळा आणुन आम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर वेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलिसांच्या स्वसंरक्षनार्थ आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार याचे दिशेने झाडलेली गोळी त्याचे उजवे पायाचे पंजावर लागुन तो जखमी झालेला आहे. पोलीसांनी वरील सर्व तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द भा.द.वि. कलम 307, 353, 332, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे आरोपी कीती निर्ढावलेले आहेत हे लक्षात येते. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस करत आहेत.

COMMENTS