Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन महिन्यांपासून पसार असलेला आरोपी जेरबंद 

अहमदनगर :  एमआयडीसी व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दहशत करणारा व नऊ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला  तोफखाना पोलिसांनी शिताफीने पकडला. ही का

नगरमधील व्यापारी एकजूट आता फुटीच्या उंबरठ्यावर ?
सांडव्याच्या स्वामी मठात आज दत्त जयंती ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
वासुदेव देसले यांची उपविभागीय पोलिस अधिकारी पदी पदोन्नती

अहमदनगर :  एमआयडीसी व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दहशत करणारा व नऊ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला  तोफखाना पोलिसांनी शिताफीने पकडला. ही कारवाई एमआयडीसीतील राहुल वाईन शॉपी समोर पोलिसांनी केली करण खंडू पाचारणे (रा. बोल्हेगाव) असे त्याचे नाव आहे. . पाचरणे याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात चार व एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच असे एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन महिन्यांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात तो पसार होता. त्याचा शोध पोलीस घेत असताना तो एमआयडीसीतील राहुल वाईन शॉपी समोर येणार असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे तोफखाना पोलिस पथकाने राहुल वाईन शॉपी परिसरात सापळा लावून पाचरणेला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार प्रमिला गायकवाड करत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, दिनेश

मोरे, भानुदास खेडकर, संदीप धामणे, वसिम पठाण, सुमीत गवळी, सतीश त्रिभुवन, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, बाळासाहेब भापसे यांनी केली.

COMMENTS