कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख (रा.
कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख (रा. सिध्देश्वर कुरोली, ता. खटाव) याला दोषी धरून कराडच्या सहजिल्हा न्यायाधीश श्रीमती होरे यांनी त्याला 10 वर्षाची सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अॅड. आर. सी. शहा यांनी काम पाहिले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कराड तालुक्यातील अल्पवयीन मुलगी होस्टेलमध्ये असताना आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख हा तिला भेटण्यास गेला. तिला कास पठार येथे फिरायला नेले. तेथे फिरून झाल्यानंतर आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पिडीत मुलीने लग्नानंतर जवळीक ठेवू, असे सांगून त्यास नकार दिला. त्यानंतरही आरोपीने तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्ती केली. याबाबत पिडीत मुलीने दि. 11 जुलै 2019 रोजी याबाबतची तक्रार कराड पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख याच्याविरोधात लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. प्रारंभी या गुन्ह्याचा तपास तत्कालीन फौजदार चेतन मछले यांनी केला.
हा खटला कराड येथील विशेष न्यायाधीश व जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. के. एस. होरे यांच्या न्यायालयात सुरू होता. खटल्यात सरकार फिर्यादी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष व सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तीवाद व पिडीत मुलीचे आई, वडीलांचे साक्षी पुरावे व वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांनी दिलेली साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीशांनी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख याला दोषी धरून वेगवेगळ्या कलमान्वये पोक्सो कायद्यांतर्गत 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. आर. सी. शहा यांनी काम पाहिले. तपासी अधिकारी म्हणून अमृता रजपूत यांनी काम पाहिले.
COMMENTS