Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोपी फिरतात मंत्रालयात मस्त, पोलीस प्रशासन झाले खाऊन सुस्त

नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र प्रकरण

अंबाजोगाई प्रतिनिधी - संबंध महाराष्ट्रात गाजत असलेल्या अवैध गैरकायदेशीर बोगस, व्यसनमुक्ती केंद्राचा पर्दाफाश सामाजीक कार्यकर्त्यांनी तसेच तिथे का

‘KGF 2’ 14 एप्रिलला अर्थातच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला | LokNews24
ध्यानी मणी स्वामी माउली… आम्हा भक्तांवर सुखाची साऊली… (Video)
आश्‍वासनांची खैरात आणि अर्थव्यवस्थेचे दिवाळे

अंबाजोगाई प्रतिनिधी – संबंध महाराष्ट्रात गाजत असलेल्या अवैध गैरकायदेशीर बोगस, व्यसनमुक्ती केंद्राचा पर्दाफाश सामाजीक कार्यकर्त्यांनी तसेच तिथे कार्यरत असणार्‍या डॉ संध्या वाघमारे यांनी नुकताच केला. केंद्रात काम करणार्‍या महिला वैद्यकीय अधिकार्‍यांशी गैरवर्तणुक व शरीर सुखाची मागणी करून तिला मानसिक त्रास देणारे, अवैधरित्या परवानगी नसलेल्या औषधींचा साठा करून बेकायदेशीररित्या नशिल्या गोळ्यांचा व्यापार करणारे, आरोपी मोकाट फिरत फिर्यादीना धमकी देत आहेत, चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांना धमकीचे फोन करत आहेत, प्रकरण मिटवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱयांना ओल्या सुक्या पार्ढ्या देत विविध अमिष दाखवीत आहेत. इतकेच नव्हे तर मुख्य आरोपी नवजीवन व्यसन मुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील ह्या चक्क मंत्रालयात सातव्या मजल्यावर मुख्यमंत्र्याच्या कक्षाबाहेर पोलिसांसमोर बिनधास्त फिरत असल्याचे फोटो नुकतेच प्राप्त झाले आहेत.
ह्या प्रकरणी एव्हढे मोठे गुन्हे दाखल होऊनही ह्या आरोपींना आतापर्यंत अटक केली नाही यात संशयाची सुई पोलीस प्रशासन आणि काही राजकीय पुढार्‍यांकडे जात आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळत पैशांची लूट करणारे हे आरोपी जर मंत्रालयात मुख्यमंत्रांच्या कक्षाबाहेर जर थेट पोलिसांसमोर बिनधास्त फिरत असतील तर न्यायाची अपेक्षा, कार्यवाहीची अपेक्षा कुणाकडून करायची असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. या आरोपींच्या ह्या अवैध व्यसनमुक्ती केंद्रावर चालत असणार्‍या गैरप्रकारांना चव्हाट्यावर आणणार्‍या डॉ संध्या वाघमारे यांना आरोपी अंजली पाटील, राजकुमार गवले यांच्याकडून धमकीचे फोन येत असल्याने त्या भयभीत होऊन पोलिसांकडे मदतीची याचना करत आहेत, सदरील आरोपी मंत्रालयात फिरत असल्याचे दिसते. पोलीस प्रशासनाच्या या बोटचेप्या भूमिकेमुळे फिर्यादीचे मनोधैर्य खचत असून जर पोलीस प्रशासनाची अशी भूमिका असेल तर अशा अवैध धंद्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी भविष्यात कोण पुढे येईल का असा संतप्त प्रश्न जनता विचारत आहे. आरोपी अंजली पाटील ह्यांचे मंत्रालयात फिरत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना पोलीस प्रशासन मात्र आंधळ्याचे सोंग घेत असल्याचे अर्थपूर्ण चित्र दिसत आहे. अद्याप या मोकाट आरोपींवर कसलीच गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अन्न व औषध प्रशासनाने कोणते गुन्हे नोंदवावेत ह्या बद्दल आम्ही अनभिज्ञ असल्याचे सांगत आहेत. यात काही अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा बाहेर रंगत आहे. या अवैध व्यसन मुक्ती केंद्रातील आरोपींना अटक करण्यात यावी म्हणून लवकरच अंबाजोगाईत उपविभागीय अधिकारी आणि अप्पर अधीक्षक कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे व शहर अध्यक्ष गोविंद मस्के यांनी सांगितले आहे.

COMMENTS