मोक्कातील आरोपी कासारला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट…?; भालसिंग यांचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोक्कातील आरोपी कासारला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट…?; भालसिंग यांचा आरोप

अहमदनगर/प्रतिनिधी- मोक्कातील आरोपी विश्‍वजीत रमेश कासार यास जिल्हा रुग्णालयातील कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप लता बाबासाहेब भाल

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांना अटक
धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची काळजी घ्या : पोलिस निरीक्षक गायकवाड
गदर 2 ने मोडले सर्व रेकॉर्ड

अहमदनगर/प्रतिनिधी- मोक्कातील आरोपी विश्‍वजीत रमेश कासार यास जिल्हा रुग्णालयातील कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप लता बाबासाहेब भालसिंग (रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर) यांनी केला आहे. या गुन्हेगारावर तसेच संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी भालसिंग यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात भालसिंग यांनी म्हटले की, माझा मुलगा ओंकार भालसिंग याचा विश्‍वजीत रमेश कासार या गुंडाने खून केला आहे. या आरोपीला अटक करण्यात आली आहे. परंतु आरोपी विश्‍वजीत कासार हा सध्या नगर जिल्हा कारागृह येथे आहे. तो वारंवार जेल प्रशासनाला आरोग्याचे कारण देऊन व त्यांची दिशाभूल करुन जिल्हा रुग्णालय येथे असलेल्या कारागृहामध्ये दाखल होतो व तेथे उपचार घेण्याचे नाटक करतो. तो आरोपी असल्याने त्याचे काही गुंडांसोबत संबंध आहेत. त्या गुंडांना तो त्या ठिकाणी बोलवून घेतो. काही गुंडांनी त्याच्यासोबत फोटो देखील काढले आहेत. समाजमाध्यमावर ते फोटो व्हायरल करुन दहशत माजवत आहे, असा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.विशेष म्हणजे पोलिस बंदोबस्तात आरोपी अटक असताना त्यांच्यापर्यंत मोबाईल जातो कसा? असा सवाल करत, मला या सर्व प्रकरणात मदत करत असलेला विष्णु भिवा कासार व मला आणि माझ्या कुटुंबीयांना संपवण्याचा डाव तो आतमध्ये आखतोय, असा गंभीर आरोपही लता भालसिंग यांनी केला आहे. माझे व विष्णु कासारचे काही बरे-वाईट झाल्यास सर्वस्वी पोलिस प्रशासन जबाबदार राहील. आमच्या जीवितास धोका आहे. आम्हाला पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणीही भालसिंग यांनी केली आहे. दरम्यान, सिव्हीलच्या कारागृहातून राहुरीच्या खून प्रकरणातील आरोपी फरार झाला असून, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. अशात आता याच कारागृहातील आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा केला गेल्याने पोलिसांच्या विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

COMMENTS