पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील नवले पूल अपघाताच्या नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे. सोमवारी सकाळी पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ सोमवारी सक

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील नवले पूल अपघाताच्या नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे. सोमवारी सकाळी पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ सोमवारी सकाळच्या सुमारास कोळशाने भरलेला कंटेनर भीषण अपघात झाला आहे. तीव्र उतारावर असताना चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट डिव्हायडरला धडकून रस्त्यावर उलटला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातात कंटेनरचालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्याच्या मध्यभागी कंटेनर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या जवळपास 4 किलोमीटपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेल्या कंटेनरला बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे. कंटेनरमध्ये 40 टन कोळसा असल्याने पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, हा कंटेनर सातार्याकडून मुंबईच्या दिशेने कोळसा वाहून नेत होता. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कंटेनर नवले पुलावर आला असता, तीव्र उतारावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट डिव्हायरला धडकला. कंटेरनचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे, मात्र त्यामुळे या मार्गावर प्रवास करणार्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला
COMMENTS