Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार योगेश कदम यांचा अपघात

घातपाताचा संशय केला व्यक्त चालक फरार

रत्नागिरी/प्रतिनिधी ः शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आणि आमदार योगेश कदम यांचा शुक्रवारी अपघात झाला. या अपघातातून ते थोडक्यात

उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ७४ पोलीस पदक
वाचाल तर वाचाल मोफत वाचलनाला तर्फे शालेय साहित्याची वाटप
वंचित ‘मविआ’ला बळ देणार का ?

रत्नागिरी/प्रतिनिधी ः शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आणि आमदार योगेश कदम यांचा शुक्रवारी अपघात झाला. या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. मात्र हा घातपात असल्याचा संशय आता आमदार कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
आमदार योगेश कदम यांचे निकटवर्तीय व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणीही केली आहे. आमदार योगेश कदम हे शुक्रवारी रात्री मतदारसंघातील आपले कार्यक्रम आटोपून मुंबईच्या दिशेला जात असताना 10 वाजता सुमारास कशेडी घाटात टँकरने कदम यांच्या कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर टँकर पलटी झाला असून टँकरचालक फरार झाला आहे. सदर अपघात इतका भीषण होता की कदम यांच्या कारचा चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने आमदार कदम आणि त्यांचे सहकारी या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. कदम यांचे चालक दीपक कदम आणि सुरक्षेसाठी असलेल्या दोन पोलिसांना किरकोळ जखम झाली आहे. 

COMMENTS