Homeताज्या बातम्यासंपादकीय

जातीनिहाय जनगणनेचा स्वीकार -नकारातील वास्तव!

पुड्डेचेरीच्या एनआयटी आणि दिल्लीच्या आयआयटी मधून उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या डॉ. राजेश्वरी अय्यर  ज्या सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत; त्यांनी

क्रूर दहशतीचा खात्मा
धार्मिक स्थळे आणि कोरोना !
ओबीसी आरक्षणाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

पुड्डेचेरीच्या एनआयटी आणि दिल्लीच्या आयआयटी मधून उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या डॉ. राजेश्वरी अय्यर  ज्या सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत; त्यांनी नुकतीच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेली पोस्ट, ही अतिशय वादग्रस्त आणि तितकीच विरोधाभासी आहे. त्यांच्या मते भारतामध्ये ब्राह्मण दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहेत; मात्र हेच ब्राह्मण शिक्षण व्यवस्थेत सर्वाधिक संख्येने म्हणजे ६० टक्के पेक्षा अधिक प्राध्यापक आहेत; परंतु, त्यांना समाजातील वागणूक मात्र चौथ्या दर्जाची आहे! त्याचवेळी, त्या हे ही म्हणतात की, भारतातील सर्वोच्च शिक्षण प्राप्त करणारे ब्राह्मण हे ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत; परंतु, त्यांना समाजातील वागणूक मात्र चौथ्या दर्जाची आहे. त्याबरोबरच भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक सीईओ हे ब्राह्मण समाजातून आहेत. परंतु, त्यांना सामाजिक वागणूक मात्र चौथ्या दर्जाची दिली जाते. वास्तविक एनआयटी आणि आयआयटी झालेल्या डॉ. राजेश्वरी अय्यर  सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. परंतु, ब्राह्मण समाजाविषयी त्यांनी केलेली ही पोस्ट,  एका बाजूला कमी संख्येने असणाऱ्या ब्राह्मण समाजाने देशातील महत्त्वपूर्ण जागा कशा बळकावल्या आहेत, हे एका बाजूला ते अभिमानाने सांगतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांना चौथा दर्जाची वागणूक समाजात मिळते, असं ते म्हणताहेत. वास्तविक, आज राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या जी परिस्थिती भारतात उभी राहिलेली आहे, त्यामध्ये सर्वाधिक वर्चस्व, हे ब्राह्मणी वादाचे आहे, असे अनेक सामाजिक विचारवंत देशात आरोप करीत आहेत. अशावेळी डॉ. राजेश्वरी यांची ही पोस्ट नेमकी काय म्हणते, तर खास करून आंतरराष्ट्रीय पातळीवर एका बाजूला ब्राह्मण समाजाची महती सांगणं, दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरचा अन्याय सांगणं, यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सहानुभूती मिळवण्याची एक गरज निर्माण झाली आहे का? जर भारतामध्ये आहारावरून, विहारावरून आणि एकूणच राजकीय, सामाजिक अन् आर्थिक बाबी अतिशय तणावपूर्ण असताना आणि त्यावर खरंतर वरच्या जात समूहांचा प्रभाव असतांना, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीला उच्च जातीय समुदाय जसा जबाबदार आहे, तसे त्यांचे दुष्परिणाम आगामी काळात जर झाले तर त्यालाही तेच जबाबदार ठरतील. परंतु, राजेश्वरी अय्यर यांनी कोणत्याही संशोधनाशिवाय, किंबहुना कोणत्याही डेटा शिवाय, अशी केलेली मांडणी ही त्यांच्या उच्च शिक्षणाचा अपमान करणारीच आहे. उच्चशिक्षित व्यक्तीने कोणताही डेटा गोळा केल्याशिवाय किंवा सर्वे केल्याशिवाय अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. अशा व्यक्तींच्या वक्तव्याला जनसामान्यांमध्ये संशोधनाचा एक दर्जा ठरतो. परंतु, तो जर प्रत्यक्षात नसेल तर मग त्यांच्या उच्च शिक्षणाची एक प्रकारे समाज दखल घेणार नाही; हे त्यांनी एक स्कॉलर म्हणून निश्चितपणे लक्षात घ्यावं. भारतीय समाज आजही जातनिहाय जनगणनेची मागणी करतो आहे. याचा अर्थ खालच्या जात समूहांकडून ही मागणी अधिक प्रमाणात येते आहे. वरचे जातसमुह जात निहाय जनगणना टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ, जातींच्या विषयी सत्य माहिती बाहेर येण्यास वरच्या जाती घाबरत आहे. खालच्या जाती मात्र जातनिहाय जनगणनेचा आग्रह करीत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, वरच्या जातींनी या देशातल्या साधन संसाधनांचा मलिदा अधिक ओरबाडला आहे; हे वास्तव बाहेर येऊ नये, याची भीती त्यांना आहे. जेणेकरून समाजामध्ये असंतोष निर्माण होईल आणि दुसऱ्या बाजूला आरक्षण प्राप्त झालेल्या ५०% समाजाच्या पदरी या देशाची साधन संपत्ती पडलेली नाही; हे वास्तव देखील बाहेर येणार आहे! त्यामुळे, आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांची बोलती जशी बंद होईल, तसेच जातनिहाय जनगणना झालीच तर आतापर्यंत देशाच्या साधनस्रोतांचा जो मलिदा वरच्या जात समूहाने ओरबाडला आहे, त्याचे वास्तव देखील समोर आल्याशिवाय राहणार नाही! त्यामुळे डॉ. राजेश्वरी अय्यर सारख्या विद्वानांनी उच्च शिक्षण घेतलेल्यांनी, अशा बनावट बाबींना पुढे करून किंवा कोणतीही आकडेवारी न देता संशोधनाचा आव आणून एखादी गोष्ट सांगणे आणि ती समाजाच्या हिताची नसणे, या बाबी त्यांच्या उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्वाला न शोभणाऱ्या आहेत.

COMMENTS