Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारधाव ST Bus च्या एक्सलेटरचं घाटात पेडल तुटलं

विठ्ठलवाडी प्रतिनिधी - विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरच्या दिशेने एसटी बस निघाली. मात्र कसारा घाटात एसटीच्या एक्सलेटरच पेडल तुटला. यानंतर एसटी चाल

नायब तहसिलदार यांच्या वाहनाचा अपघात;मोटरसायकल स्वार गंभीर जखमी
चेंबर साफ करताना 2 कामगारांचा मृत्यू
मनमोहन माहिमकर कामाच्या शोधात

विठ्ठलवाडी प्रतिनिधी – विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरच्या दिशेने एसटी बस निघाली. मात्र कसारा घाटात एसटीच्या एक्सलेटरच पेडल तुटला. यानंतर एसटी चालक आणि कंडक्टरने जी शक्कल लढवली ती पाहून अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. अखेर दोरीचा वापर करत बस नाशिकला पोहचली. चालक गाडी चालवत होता तर कंडक्टर दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये देखील ती बस दुरुस्त केली गेली नाही. त्यात चालक आणि कंडक्टरची तरी काय चूक, बस दुरुस्त केल्या जात नसतील तर एसटी डेपो आहेत तरी कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये चालक गाडी चालवत आहे, तर कंडक्टर दोरी हातात पकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हा सर्व प्रकार पाहून बसमधील प्रवाशांचा संताप अधिक विकोपाला गेला. नागरिकांनी गोंधळ घालत धावत्या बसमधली ही दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

COMMENTS