Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेचा पाठलाग करून शिवीगाळ, गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः महिलेचा पाठलाग करून हात धरला तसेच शिवीगाळ करीत तिच्या मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. शनिवारी दुपारी कोठला भागात ही घटना

आरपीआयचे पवन भिंगारदिवे यांचे भिंगार कॅम्प पोलीसस्टेशन समोर उपोषण सुरू
देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान-अरविंद धिरडे
 गावोगावच्या शाळांना राजकारणाचा अड्डा बनवू नका ः भरत आंधळे

अहमदनगर/प्रतिनिधी ः महिलेचा पाठलाग करून हात धरला तसेच शिवीगाळ करीत तिच्या मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. शनिवारी दुपारी कोठला भागात ही घटना घडली. या प्रकरणी केडगाव उपनगरात राहणार्‍या महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून माल वाहतूक गाडीवरील (एमएच 16 एई 948) अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शनिवारी दुपारी मुलीला भेटण्यासाठी केडगाव येथून रिक्षाने कोठला येथे आल्या होत्या. त्या रिक्षातून खाली उतरून पायी जात असताना अनोळखी व्यक्तीने त्यांचा पाठलाग केला. त्यांचा हात पकडून,‘चल माझ्या सोबत’, असेे म्हणाला. फिर्यादी यांनी घडलेली घटना त्यांच्या मुलाला फोनवरून कळवली. त्यांचा मुलगा घटनास्थळी आला असता त्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादी व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करीत मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केली व तो त्याच्या माल वाहतूक गाडीतून निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS