Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भातकुडगाव फाटा येथील उपोषण स्थगित

शेवगाव तालुका ः शेवगाव-नेवासा राज मार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर मराठा सेवक चंद्रकांत महाराज लबडे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव,जोहरापूरचे

काशिनाथ खोसे पाटील यांचे निधन
शुक्राचार्य मंदिर सेवकांचा कामगार दिनी सन्मान
संस्कारक्षम पिढी घडविणे हे शिक्षणाचे ध्येय असावे ः माजी मंत्री टोपे

शेवगाव तालुका ः शेवगाव-नेवासा राज मार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर मराठा सेवक चंद्रकांत महाराज लबडे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव,जोहरापूरचे सरपंच अशोक देवडे, प्रहारचे तालुकाध्यक्ष रामजी शिदोरे यांचे मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ चालू असलेले उपोषण माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, जनशक्तीचे शिवाजीराव काकडे, शेवगाव नायब तहसीलदार बक्रे, कु.धनश्री अर्जुन बनकर यांच्या प्रमुख उपस्थित लिंबू पाणी घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले.
मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण प्रश्‍नी अंतरवाली सराटी येथे चालू असलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठा सेवकांनी भातकुडगाव फाटा येथील उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून त्यावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. यावेळी शिवशाहीर कल्याण काळे,भारुडकार हमीद सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक मेरड, रांजणीचे सरपंच काकासाहेब घुले, दहिगावनेचे सरपंच राजाभाऊ पाऊलबुदे, देवटाकळीचे सरपंच माऊली खरड, हिंगणगावचे सरपंच सतीश पवार, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, मराठा महासंघाचे रावसाहेब मरकड, अशोक दुकळे, भगवान आढाव, ढोरसड्याचे सरपंच माऊली निमसे, विकास संस्थेचे चेअरमन बाळासाहेब मरकड, संभाजी गवळी, कामधेनु पतसंस्थेचे बाळासाहेब काळे, अ‍ॅड राजेंद्र शेळके, सचिन फटांगरे, सोनईचे कामगार तलाठी विजय जाधव, संतोष मेरड, मच्छिंद्र आर्ले, राजेंद्र चव्हाण, आबासाहेब राऊत, अशोक फटांगरे, बाबा साबळे, अण्णासाहेब दुकळे, ज्येष्ठ पत्रकार आर आर माने, भाऊराव फटांगरे, देवधन वाघमारे, अशोक पंडित, दादासाहेब देवढे, सुरेश लांडे, पत्रकार शहाराम आगळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS